🌟एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मिडिया परिषदेची चळवळ गतिमान करणार - राज्यकार्याध्यक्ष अनिल वाघमारे


🌟शेगांव येथे डिजिटल मीडिया परिषद जिल्हास्तरीय बैठक संपन्न🌟 


✍️ मोहन चौकेकर 

शेगाव : महाराष्ट्र राज्यात पत्रकारांची एकजूट किती आवश्यक आहे याची माहिती देण्याबरोबरच पत्रकारावर अन्याय ,हल्ले होतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोणीही उभे राहत नाही.उलट त्या पत्रकाराला नावे ठेऊन हिनवले जाते.आता आपणही अन्यायाविरोधात जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे.यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे काम करणाऱ्या पत्रकारांना आधार देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली राज्याभरात डिजिटल मिडिया परिषदेची चळवळ गतिमान करणार असल्याचे मत डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले ते बुलढाणा जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या शेगांव येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत बोलत होते.मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची बुलढाणा  जिल्हा शाखेची बैठक शेगाव येथील विश्राम भवन च्या हॉलमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मिडीया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे हे होते. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे अमरावती विभागीय सचिव अमर राऊत, शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहिमभाई देशमुख,डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट सह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.आलेल्या प्रमुख मान्यवरांचा यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातल्या पत्रकारांना शासकीय सुविधा निर्माण करण्याबरोबरच अन्याय अत्याचार विरोधी भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे शासनाकडे सतत पाठपुरावा करत असतात. राज्यातील यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक आणि पत्रकार यांनाही त्यांच्या न्याय्य हक्काच्या प्रमुख मागण्या मान्य करून देणं आवश्यक आहे.हे लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेची डिजिटल मिडिया परिषद ही विंग सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल मिडिया परिषदेचे जाळं संपूर्ण राज्यात निर्माण करण्यासाठी आपण जिल्हास्तरीय बैठका घेण्याचं नियोजन केले. या माध्यमातून जिल्हास्तरावर डिजिटल मिडिया परिषदेचे पदाधिकारी नियुक्ती व महत्त्वाच्या विषयावर चर्चा सत्र सुरू केले असल्याचे सांगून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मिडिया परिषदेची चळवळ अधिक गतिमान करणार असल्याचे ही शेवटी बोलताना राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितले.तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांचे नेतृत्वाखाली व डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात डिजीटल मीडिया परिषदेची वाटचाल सुरू केली आहे. डिजिटल मिडिया परिषदेचे ध्येय धोरणे व उद्दिष्टे यासंबंधीची माहिती प्रास्ताविकात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी दिली. तसेच  जिल्हा कार्यकारिणी आणि जिल्ह्यातील तालुका निहाय नियुक्या लवकरच जाहीर  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय सचिव अमर राऊत यांनी वर्तमान पत्र, न्यूज पोर्टल, युट्युब चे संपादक, पत्रकार यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद यांच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याची ग्वाही दिली आवाहन केले तर शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहीमभाई देशमुख, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे विभागीय संघटक राजेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत एकजूट हीच पत्रकारांची खरी ताकद असल्याचे सांगितले. बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर,जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम वानखडे खामगाव,जिल्हा सरचिटणीस संजय नागरे सिदखेड राजा यांना नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच फहिमभाई देशमुख, राजेश चौधरी,नंदु कुळकर्णी,धनराज ससाने शेगाव,दिनेश येवले नागपूर,नारायण दाभाडे शेगाव आदीचा सत्कार यावेळी करण्यात आला.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शेगाव तालुका पत्रकार संघाचे सचिव नंदू कुळकर्णी यांनी केले.

बैठकीला अनिल दराडे बाजीराव वाघ सिंदखेड राजा राजेंद्र डोईफोडे,प्रविण काकडे,समाधान भालेराव देऊळगाव राजा, सचिन कडूकार, प्रशांत इंगळे,संतोष देठे,सुभाष वाकोडे, श्याम पहुरकर,प्रशांत खत्री शेगाव, गोपाल ढगे, पुरुषोत्तम भातुरकर नांदुरा,विजय घोडे तेल्हारा,अमोल बुटे,श्रीधर ढगे खामगाव आदीसह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या