🌟प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रवेशा बाबत प्रहार जनशक्ती पक्षाकडून खुलासा.....!


🌟शिवसेना (उबाठा) आ.राहुल पाटील यांच्याकडून देण्यात आलेली बातमी खोटी व दिशाभूल करणारी - जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने


परभणी (दि.१६ आगस्ट २०२३) - परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार मा. राहुल पाटील साहेब यांनी दोन दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख गजानन चोपडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश अशा मथळा खाली आपल्या वृत्तमानपत्रात बातमी प्रसिध्द केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हाप्रमुख या नात्याने वरील खोटी व दिशाभूल करणाऱ्या बातमीचा खुलासा करणे आवश्यक आहे असे वाटते म्हणून हा खुलासा, दोन दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे यांचा शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश अशी बातमी आपल्या वृत्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली. मुळात प्रहार जनशक्ती पक्ष परभणीची युवा आघाडी व महिला आघाडी दोन्ही आघाडीच्या जिल्हा प्रमुखासह दि. २० मार्च २०२३ रोजी पक्षाचे प्रमुख मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आली होती व याबाबत आपल्या वृत्तमानपत्रासह सर्व वृत्तामानपत्रात बातमी देखील छापून आली होती. जिल्ह्याची यूवा आघाडी संपूर्ण कार्यकारणी ५ महिन्यापूर्वी बरखास्त केली असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे कुठलेही पद नसलेल्या गजानन चोपडे या कार्यकर्त्याला युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख पद दाखवून युवा आघाडी जिल्हा प्रमुखाचा शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश अशी खोटी व दिशाभूल करणारी बातमी मा. आ.राहुल पाटील यांच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाची वाढती ताकत पाहता परभणी मतदार संघातील जनतेची दिशाभूल करण्याचे व प्रहार जनशक्ती पक्षास बदनाम करण्याचे काम मा. आ. राहुल पाटील यांच्याकडून केले जात आहे. आपल्याच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उभे करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश करून घेणे व वर्तमान पत्रात शेकडोंचा प्रवेश झाला असे दाखविण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे.

प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार मा. आ. राहुल पाटील यांच्या मते प्रहार जनशक्ती पक्षाच्या ज्या शेकडो कार्यकर्त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षात प्रवेश केला त्या शेकडो कार्यकर्त्यां पैकी कुठल्याही पाच कार्यकर्त्यांची नावे व ओळख आ.राहुल पाटील यांनी जाहीर करावीत असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात येत आहे.


सोबत - प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने युवा आघाडी व महिला आघाडी बरखास्त केल्या बाबत दि.२०.०३.२०२३ ची प्रेसनोट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या