🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या मित्रांना माहितीये ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक गौप्यस्फोट🌟

✍️ मोहन चौकेकर

* हायवेवरून प्रवास करताना टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि सर्व माहिती मिळणार, तक्रारही करता येणार; राजमार्गयात्रा अ‍ॅप लाँच

* नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या मित्रांना माहितीये ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक गौप्यस्फोट

* देश पुन्हा हादरला सामुहिक अत्याचार करुन अल्पवयीन मुलीला कोळशाच्या भट्टीत जीवंत जाळलं

* ठाण्यात एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण ; घटनेचा VIDEO व्हायरल

* सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद; व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 542.10 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्क्यांनी घसरून 65,240.68 वर बंद झाला

* भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी टेस्ला सज्ज; पुण्यात उघडले पहिले कार्यालय

* शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ; हिंदू राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह सहा जणांना अटक, 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

* आमदार निवासाच्या भुमीपुजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले, त्यामुळे अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना उधाण 

* जालन्यात संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा ; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

* तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या वादग्रस्त विधान प्रकरणी पुरोगामी नेत्यांची बैठक, सांगलीत हजारोच्या संख्येने 13 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर ठिय्या करून चळवळ उभा करणार - भारत पाटणकर

* काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्ष नेते

* विजय'वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन

* रानकवी म्हणून ओळखले जाणारा शब्दांचे जादुगार हरपला!ज्येष्ठ कवी गीतकार ना धों महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

* मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांच्या जिल्हात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ कायदा व सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सरकारवर टीकास्त्र 

* सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ, शतपावलीसाठी गेलेल्या पीएसआयची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

* पालथ्या घड्यावर पाणी! गौतमी पाटीलने इशारा देऊनही नको तेच घडलं, सोलापुरातही झाली दगडफेक

* पंतप्रधान नरेंद्र मोदीं पाठोपाठ  गृहमंत्री अमित शाह करणार लवकरच पुण्याचा दौरा

* भिडे गुरुजींची बदनामी करण्यासाठी हेतुपूर्वक तो व्हिडीओ व्हायरल केला जातोय --हनुमंत पवार.

* रक्त आणि अश्रूंनी जर हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार ? दैनिक सामनातून सवाल

* संजय राऊत यांनी सांगितलं नितीन देसाईंच्या मृत्यूचं खळबळजनक कारण

* नितीन देसाईंवर जबरदस्ती केली का याचा तपास करणार - देवेंद्र फडणवीस

* मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन संपन्न

* अजित पवार पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या चर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन म्हणाले आता बदल नाहीच

* स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये कोणताही वाद नाही - राजू शेट्टी

* प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन ईडीचा दावा

* अहो जयंत पाटील आमचं तुमच्याकडेच लक्ष आहे, अजित पवारांचं सूचक विधान

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या