🌟परभणी येथील प्रमोद अंभोरे यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वर्धा येथे सन्मानित....!


🌟महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ मान्यवरांचा सत्कार🌟 

वर्धा (दि.२७ आगस्ट २०२३) - परभणी शहरातील अविरत शैक्षणिक कार्य करणारी शैक्षणिक संस्था माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव तथा शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, दै./ सा. बंड व समाजहित न्यूज चॅनलचे संपादक, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे परभणी तालुका सहसचिव, तथा परभणी डिजिटल मीडिया परिषद प्रमुख प्रमोद अशोकराव अंभोरे यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, रुग्णहितार्थ क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था, परभणी यांच्या वतीने दिनांक 27 ऑगस्ट रोजी सत्येश्र्वर हॉल, मेघे बोरगाव वर्धा येथे महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 35 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यात वर्धा लोकसभा मतदार संघाचे सदस्य खा. रामदासजी तडस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमोद अंभोरे यांना "महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023" सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खा. रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन माजी न्यामूर्ती अरुण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष इंजि. आर.डी.मगर, पुरस्कार निवड समिति अध्यक्ष मो.इलियास कच्छी, स्वागताध्यक्ष मोहनराव मोहिते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या