🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १८ मिलिमीटर पावसाची नोंद....!


🌟पुर्णा तालुक्यात १९.२ मिलिमीटर पावसाची नोंद🌟 

परभणी (दि.२० आगस्ट २०२३) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक पालम तालुक्यात २५.४ मि.मी. पाऊस पडला आहे. तर गंगाखेड २२.७, जिंतूर २१.२, परभणी १९.३, पुर्णा १९.२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मानवत १४.५, पाथरी आणि सोनपेठ १२.७, आणि सर्वात कमी सेलू तालुक्यात १०.९ मि.मी. पाऊस पडला आहे. तर औरंगाबाद विभागात सरासरी ७.८ मि.मी. पाऊस पडल्याची‌ नोंद झाली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या