🌟परभणी जिल्ह्यातील सेलू येथे बुधवार दि.०९ ऑगस्ट रोजी प्रख्यात व्याख्याते तथा सिने कलावंत शरद पोंक्षे यांचे व्याख्यान....!


🌟'समग्र सावरकर' या विषयावर शरद पोंक्षे हे विचार मांडणार आहेत🌟 

परभणी/सेलू (दि.०६ ऑगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातील सेलू येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने ०९ ऑगस्ट क्रांती दिन आणि माजी  नगराध्यक्ष तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वर्गीय ॲड.वसंतराव खारकर यांच्या जयंती निमित्त प्रख्यात व्याख्याते तथा सिने कलावंत शरद पोंक्षे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेलू शहरातील साई नाट्यगृहात बुधवार दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास 'समग्र सावरकर' या विषयावर शरद पोंक्षे हे विचार मांडणार आहेत तरी या व्याख्यानास सर्व सावरकर प्रेमी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर आणि ॲड.उमेशराव खारकर यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या