🌟परभणी जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजाचे विविध मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन....!


🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत पाठवण्यात आले निवेदन🌟


[मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र जुन्या ब्रिटिश कालीन निजाम कालीन शासकीय गॅजेटर्स जनगणना संशोधन अहवाल व ऐतिहासिक पुराव्या च्या आधारावर देण्याचे आदेश निर्गमित करण्याची प्रामुख्याने मागणी]


परभणी (दि.०९ आगस्ट २०२३) - जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज बुधवार दि.०९ आगस्ट २०२३ रोजी मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव,कोळी मल्हार या जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र सुलभ रीतीने द्यावी अशी मागणी आदिवासी कोळी महादेव समाज परभणी जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी  कार्यालय परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे संशोधन न करता हेतू पूरक कटकारस्थान करून औरंगाबाद व किनवट जात पडताळणी समिती जात वैधता प्रमाणपत्र नाकारत आहेत तरी मराठवाड्यातील या जमातींना जुन्या नोंदी कोळी असल्या तरी ब्रिटिश कालीन, निजाम कालीन, शासकीय गॅजेट्स, जनगणना संशोधकाचे अहवाल व ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर  जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश निर्गमित करावेत अशी मागणी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीने खालील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत आदिवासी संचालक काय गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार समान विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव, कोळी मल्हार जमातींना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे. कोळी महादेव , कोळी मल्हार, टोकरे कोळी या जमातीची नोंद ही कोळी या जनरिक टर्म या शोधणे बाबत असल्याने कोळी जनरिक टर्म सामान्य संज्ञा असल्याबाबत शासनाने परिपत्रक निर्मित करावे निजाम कालीन, ब्रिटिशकालीन, जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नोंदी कोळी झाल्या असल्याने केवळ कोळी नोंदीवरून ह्या दोन्ही जमातीचे प्रकरणे अवैद्य ठरवू नये सन 1950 पूर्वीचा पुरावा व रक्त नात्यातील  वैधता प्रमाणपत्र न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव मल्हार कोळी जमातींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाडा विभागात प्रधान्याने विशेष अभियान राबवावे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे रक्तातील नाते जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर त्या परिवारातील इतर सदस्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र द्यावे कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला अनेक वर्ष लाभांपासून वंचित ठेवल्याने शबरी घरकुल वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी प्राधान्यक्रम क्रमाने पात्र ठरवावे वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या जात वैधता प्रमाणपत्र अभावी रोखून ठेवलेल्या पदव्या द्याव्यात जमाती जमाती वाद वाढू नये जमातीचे प्रकरणे निपक्षपातीपणे तपासली जावी यासाठी पडताळणी समितीमध्ये बिगर आदिवासी अधिकारी यांची नियुक्ती करावी पूर्वी दिलेल्या जात वैधता या जाणीवपूर्वक वेगवेगळी कारणे लावून पुनर् तपासणी करण्याचे षडयंत्र थांबवावे प्रकल्प कार्यालय आणि अनुसूचित जमाती सल्लागार समितीवर विस्तारित क्षेत्रातील वंचित जमातीचे प्रतिनिधित्व द्यावे माननीय उच्च न्यायालयाने शिक्षा केलेल्या अधिकाऱ्यांची पडताळणी  समितीवर नियुक्ती करू नये

विविध मागण्याचे निवेदन आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना रमेश पिटलवाड मराठवाडा अध्यक्ष, निवृत्ती रेकडगेवार, गणेश सूर्यवंशी, अच्युतराव सोगे, वैजनाथ मेघमाळे , महादेव सुरवसे,डॉक्टर दिनेश कांबळे,  किशोर सूर्यवंशी,गजानन सुरवसे , मारुती जगताप, तुकाराम सोळंके, जगन्नाथ जंगले, कोंडीबा भंगे, दिगंबर भिसे, साईनाथ सोळंके, काशिनाथ दारकोडे चंद्रकांत बुधवारे, ओम मुदीराज , वैजनाथ एरंडवाड,इत्यादी आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या