🌟परभणीत बामसेफचे रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी अधिवेशन....!


🌟बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे राज्यव्यापी अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत🌟


परभणी (दि.२७ ऑगस्ट २०२३) :  बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३७ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी परभणीत होणार आहे.

            स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी सकाळी ११-०० वाजता या अधिवेशनास सुरुवात होणार असून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे अध्यक्षस्थानी तर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश टी.व्ही.नलावडे हे उद्घाटन म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रदीप पौळ, एम.एम. कोटूले, विद्याधर मानगावकर, जयंत सोनवणे, एस.आर. बरगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात तीन सत्रात बहुजन समाजाशी निगडीत नऊ वेगवेगळ्या विषयांवर 14 नामांकित विद्वान व विचारवंत प्रबोधन करणार आहेत. या अधिवेशनास बहुजन समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बामसेफचे प्रभारी गोरखनाथ वेताड, मंगला थोरात, राज्याध्यक्ष अभिजित भगत, कार्याध्यक्ष सुमित्रा आहेर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या