🌟परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’निमित्त प्रतिज्ञा....!


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟


परभणी (दि.१८ ऑगस्ट २०२३) : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती देशभरात ‘सद्भावना दिवस’ म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


सर्व धर्म, भाषा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि सांप्रदायिकतेमध्ये एकमेकांप्रती सद्भाव वाढविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश्य असून, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार सुरेश घोळवे, श्रीराम बेंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या