🌟पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश' कार्यक्रमाचे आयोजन.....!


🌟यावेळी देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तसेच देशभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी पाच महत्वपूर्ण संकल्प🌟

पूर्णा (दि.१८ आगस्ट २०२३) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्य सैनिक  सूर्यभानजी पवार महाविद्यालयात " मेरी माटी मेरा देश " अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून " मेरी माटी मेरा देश " अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.  दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी मातृभूमीला वंदन करण्यात आले. दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी तसेच देशभक्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी पाच महत्वपूर्ण संकल्प करण्यात आले.

" हर घर तिरंगा " या उपक्रमात १३, १४ व १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकच्या मार्फत विद्यार्थ्यांना घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहीत केले. १५ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या वीर पुरुषांनी आपले योगदान दिले अशा वीरांना वंदन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत हे उपक्रम राबविण्यात आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ पी.डी सूर्यवंशी, प्रा.डॉ दीपमाला पाटोदे व  रासेयोच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या विविध कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या