🌟नांदेड जिल्ह्यात गोरगरीब सामान्य जनतेला कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या संस्थाचालकासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल...!


🌟बहुजन समाज पार्टीच्या प्रयत्नाने अनेकांना मिळाला न्याय🌟

नांदेड (प्रतिनिधी) - नांदेड जिल्ह्यात गोरगरीब सामान्य जनतेला स्वस्तामध्ये वस्तू व धान्य देण्याचे अमिष दाखवुून शहरात कार्यालय उघड़ुन पी.आर.ओ.च्या माध्यमातून संस्थेच्या नावाने पैसे जमा करून कोट्यावधीचा गोरगरीब जनतेला चूना लावणा्या संस्थाचालकावर व संचालक मंडळाबर, लाभार्थी व पी. आर. ओ. सरीता गवटी, अनिल पाईकराव, आशा ओहळ, भास्कर कदम, नेहा रगडे, बालाजी हिंगोले, शिल्पा गच्चे, दिपीका थोरात यांनी बहजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनिषभाऊ कावळे, प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, सखाराम मामा इंगोले यांच्याशी संपर्क करून तक्रार केली, त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्द्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये बेरोजगार, गरीब महिला, पुरूषांना छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था धार ता. औढा (ना.) जि.हिगोली संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या नावांने संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पि.शंकर सुतारे व राजकुमार पि.शंकर सुतारे व संचालक मंडळ यांनी पी.आर.ओ. नियुक्ती केली व मजुरदार, गोरगरीब जनतेला स्वस्तामध्ये म्हणजेच केवळ 11,00/- रूपयामध्ये गहू, तांदूळ, जैष्ठ महिला, विधवा, निराधार यांना केवळ 1, 200/-रूपयांमध्ये वार्षीक रूपये 10,000/- पेन्शन योजना तसेच 1,600/- रूपयांमध्ये जनकल्याण बांधकाम कामगारांचा फॉर्म भरून घेतला व सायकल, शिलाई मशिन साठी 2,20o/- प्रत्येकी, इलेक्ट्रीक स्कूटी साठी 25,000/-, गुणवंत विद्याथ्थ्याना लेंपटॉप साठी 5.500- असे स्वस्त वस्तू व धान्य देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे जवळपास 700 ते 800 पी.आर. ओ. नी हजारो लोकांकडून फार्म भरून सभासद करून त्यांच्याकडून कोट्यावधी रूपये भरून घेतले. त्यांना कुठलीच वस्तू किवा धान्य दिले नाही. त्यामुळे त्रस्त होऊन नियुक्त पी.आर. ओ. यांनी संस्थाचालक बाबासाहेब शंकरराव सुतारे याना तसेच कार्यालयात वारंवार चकरा मारल्या मात्र त्यांना धान्य किंवा वस्तू न देता उलट धमक्या, शिविगाळ करून कार्यालया बाहेर काढले. यामुळे संतापलेल्या पी.आर. ओ. सरीता गवटी, अनिल पाईकराव, आशा ओहळ, भास्कर कदम, नेहा रगडे, बालाजी हिंगोले, शिल्पा गच्चे, दिपीका थोरात यांनी बसपा प्रदेश प्रभारी मनिषभाऊ कावळे, प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, सखाराम मामा इंगोले यांच्याशी संपर्क करून तक्रार केली. त्यावरून त्यांनी पोलीस अधिक्षक यांना माहिती देऊन तक्रार केली. त्यानूषंगाने पोलीस प्रशासनाने वरील संस्था चालकासह संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यामूळे गोरगरीब सामान्य जनतेला अखेर न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या