🌟सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟पुरस्कारासाठी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल🌟

परभणी (दि.०८ ऑगस्ट २०२३) :  समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उलेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०२०, २०२०-२०२१, २०२१-२०२२ व २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

यापूर्वी सन २०१९-२०२०, २०२०-२०२१ व २०२१-२०२२ या वित्तीय वर्षाकरिता अर्जदारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.  अर्जदारांनी अर्ज केलेल्या वर्षातील चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा.  ज्या कालावधीकरिता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज केल्यास त्या अर्जाचाही विचार करण्यात येईल. अर्ज केलेले वर्ष व पुरस्कारासाठी विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. 

इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्तींना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी येथून अर्ज घेऊन ते १५ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे (सुट्टीच्या दिवशीही) कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या