🌟महाकवी वामनदादा कर्डक यांनी भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या गितांतून रुजविण्याचे काम केले...!


🌟ज्येष्ठ शाहीर काशिनाथ उबाळे यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा येथील पंचशील नाट्य ग्रुप यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाकवी वामनदादा कर्डक शाहिरी संमेलनाचे आयोजन दिनांक 16 ऑगस्ट रोजी सुभेदार रामजी सभागृह नालंदा नगर पूर्णा या ठिकाणी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आले होते.उद्घाटक म्हणून बुद्ध विहार पूर्णा येथील पूज्य भदंत पयावंश हे होते.

भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले या संमेलनामध्ये ज्यांना वामनदादांचा सहवास लाभला असे ज्येष्ठ शाहीर काशिनाथ उबाळे शाहीर भीमराव दुधमल परभणी हे प्रमुख सत्कारमूर्ती होते.पहिल्या सत्रामध्ये दिवंगत कवी मुख्याध्यापक वामन भुजबळ व पंचशील नाट्य ग्रुपचे उपाध्यक्ष दिवंगत प्रा. नितीन नरवडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कवितांचे गीताचे प्रकट वाचन करण्यात आले.

दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध  रंग कर्मी साहित्यिक जगदीश जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली  विद्रोही कवी संमेलन घेण्यात आले.यावेळी विचार मंचावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नांदेड येथील कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी शाहीर काशिनाथ उबाळे शाहीर भीमराव दुधमल  प्रकाश कांबळे ज्योतीताई बगाटे जगदीश जोगदंड यांचा पंचशील नाट्य ग्रुप तर्फे शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे दिवंगत कवी वामनराव भुजबळ दिवंगत प्राध्यापक नितीन नरवडे यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सन्मान केला.त्यांच्या पंचशील नाट्य ग्रुप व आंबेडकरी व धम्म चळवळीतील योगदानाबद्दल पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा.बंडू गायकवाड यांनी गौरव उद्गार काढले .

यावेळी नांदेड येथील कोषागार अधिकारी ज्योतीताई बगाटे यांनी वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या वामनदादा ची गीत रचना समतेवर आधारित होते.विषमतेवर त्यांनी आपल्या गीतामधून कोरडे ओढण्याचे काम केलं.आपल्या गीतामधून "टाटा बिर्ला बाटा सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो"अशा प्रकारची गीत रचना करून भारतामधील विषम समाज व्यवस्थेच प्रभावी चित्रन त्यांनी केलं.विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष जगदीश जोगदंड यांनी महाकवी वामनदादा कर्डक मानवतेचे गीत गाणारे कवी होते.

याप्रसंगी दिवंगत कवी वामन भुजबळ व प्रा. नितीन नरवडे यांच्या आठवणींना उजाळा दिला पूर्णा शहराची सांस्कृतिक चळवळ वैभवशाली बनवण्यामध्ये माझे हृदयस्त मित्र दिवंगत कवी वामनराव भुजबळ व विद्यार्थी प्राध्यापक नितीन नरवाडे यांचा सिंहाचा वाटा होता.सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे यांनी वामनदादा ची लेखनी आशय गर्भित मानवतेला समर्पित होती त्यांच्या विचाराला कृतीची जोड होती.

अध्यक्षीय समारोप मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचा समस्त जीवन आणि कार्य विशद करताना सांगितले महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार आपल्या गीत गायनातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं.पायाला भिंगरी बांधल्या गत संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर या महापुरुषांचे विचार गीताच्या माध्यमातून पोहोचण्याच काम  समर्पित भावनेने केल. प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशवराव जोंधळे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पहिल्या सत्रामध्ये दादारावजी पंडित प्राध्यापक सिद्धांत थोरात विजय गायकवाड प्राध्यापक बंडू गायकवाड प्राध्यापक दीपक पुरणेकर एडवोकेट हिरानंद गायकवाड प्राध्यापक सचिन गौरकर भूषण भुजबळ भीमा वाहुळे सुनील मगरे स्वाती मुदीराज पृथ्वीराज जोंधळे प्रज्ञा घुले आर्या अवसरमले समीक्षा गायकवाड आदींनी आपल्या कविता सादर केल्या.विद्रोही कवी संमेलनामध्ये शाहीर गौतम कांबळे नसिर शेख उमेश बाराटे त्रंबक कांबळे मंजुषाताई पाटील वामन खर्ग खराटे आम्हाला जोंधळे अमन जोंधळे मिलिंद उगले किरण सरोदे किरण गायकवाड स्वाती मुदीराज आदी कवी कवित्रींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

शाहिरी जलसा यामध्ये शाहीर काशिनाथ उबाळे विजय सातोरे अशोक गवळी मिलिंद खिल्लारे  चंद्रकांत दुथमल राहुल भगत मुक्ताबाई पंडित   प्रकाश जोंधळे एडवोकेट हिरानंद गायकवाड रत्नदीप येंगडे अविनाश जोंधळे संदीप वेडे आदी शाहिरांनी शाहिरी जलसा मध्ये आपले गीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक प्राध्यापक बंडू गायकवाड व पदाधिकारी विजय गायकवाड राहुल अवसरमले स्वाती  मुदीराज भूषण भुजबळ श्रीहरी घुले धारबा धुमाळे समीक्षा गायकवाड त्याचप्रमाणे आम्रपाली महिला मंडळ पंचशील नगर तक्षशिला महिला मंडळ नालंदा नगर आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या