🌟पुस्तक वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे - प्रा.बाबुराव दहिफळे


🌟पुर्णेतील साने गुरुजी वाचनालयात आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात ते म्हणाले🌟 


पुर्णा (दि.०१ आगस्ट २०२३) - अज्ञान हे दुःखाचे मूळ कारण आहे वाचाल तर वाचाल ज्ञान मिळवण्याची सर्वात महत्त्वाची साधन म्हणजे पुस्तक पुस्तकाने मन,मनगट,मेंदू,मस्तक,सशक्त होते पुस्तक वाचनाची आवड निर्माण होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा. बाबुराव दहिफळे यांनी केले.


पुर्णा येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात आयोजित  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ग्रंथालयाचे उपाध्यक्ष व्यंकटराव मुळे होते  यावेळी ओंकारसिंह ठाकुर, एम जे पांचाळ,टी एन पांचाळ, सुभाषचंद्रओझा, गिरीश कदम उपस्थित होते. शहरातील लार्स शाळेच्या विद्यार्थिनी साने गुरुजी ग्रंथालयाला भेट देऊन ग्रंथालय साहित्य व  पुस्तकांची वाचन केले  प्रा. दहिफळे म्हणाले जगावर प्रभाव पाडणाऱ्या महापुरुषांच्या जडणघडणीमध्ये पुस्तक वाचनाचे फार मोठे योगदान आहे आणि म्हणून पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते प्रगतीची मोठ मोठी शिखरे सहज गाठता येतात मानवी समाजाला समृद्धीकडे नेण्याचे साधन म्हणजे पुस्तक होय असे सांगितले याप्रसंगी अंजली गवळी ,मनीशा तोगरवार, श्वेता संग्रेल ,सारिका  अदि उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल सतीश टाकळकर यांनी मांडले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या