🌟परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप पिकांच्या नुकसान भरपाई पोटी अग्रीम रक्कम अदा करण्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन...!


🌟मानवत तालुक्यातील रामपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात केले जोरदार आंदोलन🌟

परभणी (दि.२३ आगस्ट २०२३) : परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अग्रीम रक्कम अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज बुधवार दि.२३ आगस्ट २०२३ रोजी मानवत तालुक्यातील रामपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात जोरदार आंदोलन केले.

            या संघटनेचे नेते किशोर ढगे, भास्करराव खटींग, रामप्रसाद गमे, रामा आवरगंड, सुरज चोखट, प्रकाश काळे, विठ्ठल कदम, कृष्णा कदम, गोपाळ काळे, संजय चोखट, अशोक काळे, महादेव काळे, तुकाराम मसलकर, नामदेव काळे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 21 दिवसांच्या खंडात थेंबभरसुध्दा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकविमा कंपन्यांच्या तरतूदीनुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई पोटी अग्रीम रक्कम मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महसूल प्रशासनाने या प्रकरणात निश्‍चितच मार्ग काढला जाईल, असे ठोस आश्‍वासन देवून आंदोलनकर्त्यांना गोदावरी पात्रातून बाहेर येण्याची विनंती केली. सुमारे दोन तासाच्या चर्चेनंतर आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या