🌟नांदेड येथील सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न....!


🌟यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा भावसार समाजाचे कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟  

नांदेड (दि.१० ऑगस्ट २०२३) : सिडको भावसार समाज नांदेड व युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन नांदेड यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सिडकोच्या ज्ञानेश्वर नगर येथे नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सतीश सितावार संस्थापक अध्यक्ष भावसार समाज सिडको नविन नांदेड हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ,नांदेड जिल्हा भावसार समाजाचे कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले ,श्री.प्रमोद टेहरे ओबीसी नेते, सिडको,नांदेड ,श्री.वैजनाथ देशमुख , भाजप मंडळ अध्यक्ष सिडको नवीन नांदेड ,श्री.अनिरुद्ध दांडगे सकल भावसार समाज मराठवाडा, श्री विनोद सूत्रावे,अध्यक्ष भावसार समाज सिडको नविन नांदेड, श्री.संजय काचावार,संचालक, स्वरांजली गायन संच,नांदेड, श्री रामदास पेंडकर ,संस्थापक अध्यक्ष भावसार सेना नांदेड हे व्यासपीठावर होते.

सदर कार्यक्रमांतर्गत बालवाडी ते दहावी,बारावी ,पदवी , पदव्युत्तर पास , पाचवी व आठवी स्कॉलरशिप , एन. एम. एम. एस.,नवोदय , एन.टी. एस, व ईतर समकक्ष परीक्षा, सर्व व्यवसाय प्रशिक्षण,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात विशेष कार्य केलेले व ज्येष्ठ नागरिक यांचे सत्कार करण्यात आले. 

 या कार्यक्रमात १०० हून अधिक भावसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,वही-पेन, फाईल, परीक्षा पॅड, विविध स्कॉलरशिप व शैक्षणिक माहिती पत्रक देऊन मार्गदर्शन करण्यात आले.भावसार समाज सिडको कार्यक्षेत्रातील दहावी व बारावी प्रथम विद्यार्थ्यांच्या मातेस आदर्श माता पुरस्कार व पैठणी साडी सप्रेम भेट देण्यात आली.

यावेळी वैजनाथ देशमुख, अनिरुध्द दांडगे रामदास पेंडकर तानुरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पंचवीस वर्षापासून हा उपक्रम सुरू असल्याने कौतुक केले.

गिरीश बुलबुले यांनी आर्थिक कमतरतेमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतल्या जाईल व गरजूंना सर्व आवश्यक ती मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले व लवकरच विद्यार्थ्यांना सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय ,वस्तीगृह सुविधा देण्यात येईल तसेच युवकांना उद्योग व्यवसायासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वावलंबी बनवणे साठी पतपेढी तयार करण्यात येईल असे सांगितले.

प्रतीक संजय सोनवणे या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील विश्वप्रसिध्द टेक्ससच्या युनिव्हर्सिटी ऑफ टॅक्सेस अॅट अरलींगटोन येथे जीआरई परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी शाखेच्या एम.एस.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरव करण्यात आला .सौ विद्या पेटकर यांच्यावतीने बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस संविधान पुस्तक देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेटकर , सुत्रसंचलन सौ विद्या पेटकर तर आभार विनोद सुत्रावे यांनी मानले .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वानंद परळकर, राजू आंबेकर, सचिन पेटकर, शशांक कठाडे, नरेश बरडे, संदिप काब्दे ,डॉ. सुनील मुधोळकर, प्रशांत पेंडकर,अनंत पेटकर, माळवतकर लक्ष्‍मण, मयुर सुत्रावे, आर्यन पेटकर, तेजस माळवे,तेजस दोटकर बंडूराम गोजे, ओमप्रकाश पेंडकर, लक्ष्मीकांत खमीतकर, शंकर सोनवणे, दिलीप क्षीरसागर ,अविनाश सुत्रावे, सत्यजित पुरणाळे, रामचंद्र माळवतकर , बरडे विजयकुमार, राजेश सितवार, गंगाधर कुसुमकर, अविनाश ढगे, बालाजी लगदिवे,बालाजी आंबेकर, जय पांडागळे, एस.मठपती,अशोक हुंडेकर आदिंनी प्रयत्न केले.यावेळी विद्यार्थी,पालक,महिला,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या