🌟उच्च नैतिकमूल्य अंगीकारून नातेसंबंध जोपासले पाहिजे......!


🌟डॉ.भदंत.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्राचे महासचिव,भदंत.डॉ.उपगुप्त महास्थवीर,भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि,30ऑगस्ट,श्रावण(निज) पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते पहाटे ०५:३० वाजता, त्रिशरण-अष्टशील,पूजापाठ,परित्राण व सूत्रपठण पूज्यनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आले दुपारी १२.३० वाजता सामुदायिक वंदना,पूजापाठ व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी म्हणून पूर्णा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी युवराज पौळ,महावितरण चे उपकार्यकारी अधिकारी निलेश उईके,शहर अभियंता मंगेश खरगे,अभिनव विद्या विहार प्रशालेचे मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमांमध्ये संतोष सोनसळे ( महाराष्ट्र पोलीस नांदेड ) यांनी काश्मीर ते  कन्याकुमारी रेस आक्रॉस इंडिया(अंतर 3641 किमी.)सायकलिंग स्पर्धेमध्ये देश पातळीवर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल त्यांचा बुद्धविहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचे महासचिव,भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी बुद्ध धम्मतत्त्वज्ञानावर यथोचित प्रकाश टाकताना बुद्ध धम्माचा विचार,अंधश्रद्धा व रूढी,परंपरा यापासून कोसोदूर आहे.या विचारांमध्ये अखिल मानव जातीचे कल्याण आहे.उच्चनैतिक मूल्यावर आधारित प्रत्येकाने नातेसंबंध जोपासले पाहिजे,अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले. 

या प्रसंगी संगीता सिताराम नगारे यांच्याकडून भिक्खू संघास चिवरदन,फलदान व उपस्थितास खीरदान करण्यात आले.कार्यक्रमास मा.प्रकाश कांबळे,नगरपालिकेचे गटनेते उत्तमभैया खंदारे,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,गौतम भोळे,वीरेश कसबे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, इंजि.पी.जी.रणवीर,ज्ञानोबा जोंधळे,हरिभाऊ हनवते,वा.रा.काळे,टी.झेड.कांबळे,अमृत मोरे आदींची उपस्थिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्र्यंबक कांबळे,अतुल गवळी उमेश बरहाटे,राम भालेराव,सुरज जोंधळे,सुमेध काळे, विहार समिती व सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या