🌟नांदेड जिल्ह्यातील रिपब्लिकन सेना नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न...!


🌟सत्कार समारंभ सोहळ्यास उस्फुर्त प्रतिसाद🌟


नांदेड : रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी शंकर थोरात यांची नियुक्ती मराठवाडा कार्याध्यक्षपदी करण्यात आली तसेच तसेच विशाल वाघमारे यांची युवा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना उत्तर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, तसेच नागराज ढवळे यांची नियुक्ती मराठवाडा संघटक पदी करण्यात आली तसेच छायाताई शिंदे यांची महिला आघाडी रिपब्लिकन सेना उत्तर पदी नियुक्ती करण्यात आली.


या अनुषंगाने आज संदीप वाठोरे,प्रशिक गायकवाड,भास्कर गजभारे,पवन जोंधळे,भारत भिसे या सर्व मित्र परिवार तर्फे  सर्वांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला त्या अनुषंगाने आज व्हीआयपी रेस्ट हाऊस नांदेड या ठिकाणी माननीय श्रीपती ढोले सर महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन सेना संदीप भाऊ मांजरमकर रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर तसेच संतोष साळवे रिपब्लिकन सेना कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच रवींद्र सोनकांबळे जिल्हा महासचिव रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर व नांदेड चे सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सत्कार समारंभ सोहळा करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या