🌟एक आगळावेगळा धोंडे जेवणाचा पर्यावरण पूरक कार्यक्रम संपन्न....!


🌟या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद परभणीच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.रश्मीताई खांडेकर यांची उपस्थिती🌟

श्री गोविंदरावजी दुधाटे यांनी त्यांच्या शेतात अगदी पर्यावरण पूरक धोंडे जेवणाचा कार्यक्रम केला.त्यांची मुलगी व जावाई यांचा लग्नाचा वाढदिवस व धोंडे जेवण असा दुग्ध शर्करा योग त्यांनी साधला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद परभणीच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रकल्प संचालक मा.रश्मीताई खांडेकर मॅडम,हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख व त्यांच्या अर्धांगिनी,पूर्णेचे तहसीलदार मा.बोथिकर साहेब,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री किशोरभाऊ ढगे,शेती सेवा ग्रुप पूर्णाचे संकल्पक श्री प्रताप काळे,अध्यक्ष श्री बालासाहेब हिंगे, सदस्य श्री गजानन आंबोरे,श्री रमेश पवार,श्री मुंजाजी जोगदंड,श्री सुभाषराव सूर्यवंशी, श्री संभाजी भोसले,श्री पांडुरंग शिंदे,श्री गोकुळ पैलवान,श्री शिंदे दूध उत्पादक,श्री गोविंदराव यांच्या सुकन्या व जावाई,देणं समाजाचं परिवार प्रमुख डॉ.गुलाबराव इंगोले,श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णाचे सचिव श्री अमृतराजजी कदम,श्री गोपाळराव भुसारे सर,प्रगतशील शेतकरी श्री माऊली शिंदे,श्री पिराजी धुळशेटे, श्री गजानन कुबडे, श्री संजय कुबडे,श्री उद्धव दुधाटे, श्री मोतिराम दुधाटे,श्री पंढरीनाथ शिंदे, श्री रगंनाथ दादा माली पाटील,श्री बाळु नावकीकर, श्री पंडित भोसले, श्री विठ्ठल कुबडे,श्री लक्ष्मण शिंदे, श्री बालाजी भुजबळ,श्री शिवकुमार बोडगमवार,श्री आबनराव पारवे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वप्रथम मान्यवर पाहुण्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.व तसेच रेशीम शेती करणारे भरघोस उत्पादन काढणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा,दुग्धव्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शेती सेवा ग्रुपची वाटचाल श्री आंबोरे यांनी अगदी अस्खलितपणे मांडली मा.रश्मीताई खांडेकर मॅडम यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांशी अगदी मनमोकळ्यापणाने हितगुज  केले व त्यांनी शेतीला जोडधंदा उभा करावा,शेती व्यवसाय म्हणून कसा करता येईल,यावर सखोल मार्गदर्शन केले श्री गोविंदराव यांच्या मुलीच्या लग्नात पाहुण्यांना आहेर म्हणून दिलेली झाडे व्यवस्थित वाढवणाऱ्या पाहुण्यांचा पण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांची मुलगी,जावाई व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यानंतर सर्व पाहुणे मंडळींच्या रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री माधवराव आवरगंड यांनी केले तर श्री गोविंदराव दुधाटे यांनी आभारप्रदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या