🌟हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद : भारतीय हाॅकीला मेजर ध्यानचंद जागतीक किर्ती मिळवून दिली....!

🌟राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : ध्यानचंद क्रीडा अकॅडमी स्वखर्चाने सर्व क्रीडा उपक्रम राबवून खेळाडूंच्या कर्तृत्वाला देते प्रोत्साहन🌟       

✍🏻लेखकप्रा.डाॅ.महेश जाधव पुर्णा               

भारताचे महान खेळाडू मेजरध्यानचंद यांचा जन्म 29 आॅगस्ट 1905रोजी अलाहाबाद येथे झाला.29 आॅगस्ट हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करतो.मेजरध्यानचंद यांनी राष्ट्रीय,अंतरराष्ट्रीय स्पर्धेत 1000 पेक्षा जास्त गोल केलेत.भारताचे महान खेळाडू हाॅकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचे कर्तृत्व खेळातील कामगीरी पाहता,त्यांनी भारतीय हाॅकीला जागतीक किर्ती मिळवून दिली.आॅलिम्पीक स्पर्धेत हाॅकी मध्ये ते खेळत असताना भारतीय संघाने जर्मनीला लागोपाठ तीन 1928 ॲमस्टरडॅम,1932 लाॅन्सएंजेलीस आणी 1936बर्लिन आॅलिम्पीक मध्ये सुवर्णपदके मिळवीली होती.या सामन्यात भारताने अंतिम सामन्यात यजमान संघाचा 8 ̵1 असा पराभव केला होता.तो दिवस 15 आॅगस्ट होता.बारा वर्षा नंतर त्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला.हा आष्चर्यकारक योगायोग आहे. या सामन्यात जर्मनी ने गोल्ड जिंकावे व आपल्या देषाची मान उंचावी म्हणून जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष हिटलर तेथे उपस्थित होता. 


कारण जर्मनी व भारत फायनल मॅच होती.भारत हा सामना हरावा म्हणून जर्मनीने खूप प्रयत्न केले.येवढेच नाही तर जर्मनीच्या फिल्ड स्टापने आपल्या प्रशासनाच्या सांगण्यावरून एक निर्णय घेतला होता.मैदानाला गरजेपेक्षा जास्त ओले केल होत.भारतीय खेळाडूचे शुज हलक्या प्रतिचे असल्याने ते घसरून पडतील असा त्यांचा समज होता.परंतू मेजर ध्यानचंद यांनी परिस्थीती ओळखली व त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला व स्वताच्या पायाचे शुज काडून टाकले.व मोकळया पायाने सामना खेळला.व भारताला 8 ̵1ने सामना जिंकून दिला.मेजर ध्यानचंद यांचा खेळ बघून हिटलर चकित झाला.हा सामना संपण्याआधी काही मिनीटे अगोदर हिटलर तावातावाने तेथूून निघून गेला.कारण स्टेडीयमच्या आत आणि बाहेर सूध्दा जर्मनीचे लोक सामना पाहण्यासाठी आले होते.परंतू भारताने हा सामना जिंकला व आॅलिम्पीक गोल्ड मेडल जिंकले.


तेथील सर्व वातावरण शांत तर भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिव शी मेजर ध्यानचंद यांना  हिटलर ने आपल्या आॅफीसमध्ये बोलावले आणि त्यांना अनेक आमिशे दाखवली व ध्यानचंद यांना पायाकडे बोट दाखवून म्हणाले तूमची गरीबी मी दूूर करतो.जर्मन सैन्यात मोठे अधिकारी,भरपूर पगार,मोठा बंगला,गाडी,जमीन देतो तूम्ही यानंतर आमच्या जर्मनी दे शाकडून खेळा. प्रचंड स्वाभीमानी आणी प्रचंड देशभक्त असलेले मेजरध्यानचंद यांनी त्यांना कडव्या शब्दात सरळ नकार दिला.मेजरध्यानचंद यांचा खेळतर जादूमय होताच पण त्यांच्या कडव्या देषभक्तीसाठी आपल्या कडून त्यांना मानाचा मुजरा. याच फायनल मॅच दरम्यान जर्मनीच्या खेळाडूने खेळ चालू असताना ध्यानचंद यांच्या हाॅकी स्टिकने तोंडावर मारून एक दात तोडला तरी ते खेळले.याच सामन्यात त्यांचा खेळ बघून त्यांची हाॅकी स्टिक तोडून तपासण्यात आली. तरीसूध्दा त्यांच्या खेळावर काही परिणाम झाला नाही.

या आॅलिम्पीक स्पर्धेत ते भारतीय कर्णधार होते.हाॅकीत भारताने एकून आठ सुवर्ण पदके मिळवीली आता ज्या पध्दतीने घराघरात क्रिकेट खेळले जाते त्याच पध्दतीने मेजरध्यानचंद यांच्या काळात भारतात हाॅकी खेळली जात होती.परंतू 1980नंतरच्या आॅलिम्पीक स्पर्धेनंतर हाॅकीला जी घसरण लागली तिच्यामूळे लोकांचे या खेळाकडे दूर्लक्षच झाले.खेळ कोणताही असो एखादया राष्ट्रीय स्पर्धेस मेजरध्यानचंद यांचे नाव देण्यात यावे उदा.क्रिकेट मधील रणजी करंडक. तेंवहा कूठे ध्यानचंद यांचे क्रीडा कामगीरी प्रत्येक वेगवेगळया खेळातील खेळाडूला कळेल.  खेळात चांगले प्रदर्षन करून दाखवतील. 2008 ते 2009 नंतर मेजरध्यानचंद यांची खेळातील कामगीरी पाहता त्यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर धरू लागली.याच काळात 2010.11 मध्ये आम्ही त्यांचे क्रिडा क्षेत्रातील योगदान प्रत्येकाच्या लक्षात रहावे व असंख्य खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने मेजर ध्यानचंद स्पोर्ट अकॅडमीची स्थापना केली असून अकॅडमी तर्फे दरवर्शी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत 

                        या स्पर्धेचे आयोजन करत असतो. आमच्या ध्यानचंद अकॅडमीचे अनेक खेळाडू भारतीय सैन्यात,महाराष्ट्र पोलीस,होमगार्ड,अग्नीशामक दल मध्ये भरती झाले आहेत.आमच्या ध्यानचंद अकॅडमीचे अनेक प्र शीक्षक वेगवेगळया शाळेत जावून प्रषिक्षण देतात.त्याच अकॅडमीचे अनेक खेळाडू तालुकास्तरीय ते राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेत.येवढेच नाहीतर आम्ही दरवर्शी पावसाळी,उन्हाळी,क्रिडा प्रशीक्षण शिबीराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत असतो.आमच्या मेजर ध्यानचंद स्पोर्टअकॅडमीने आता पर्यंत कोणतेही शासकीय क्रीडा अनूदान घेतलेले नाही.ध्यानचंद क्रीडा अकॅडमी स्वखर्चाने सर्व क्रीडा उपक्रम राबवत असतो.

  मेजर ध्यानचंद या नावाने जिल्ह्यात मोठी स्पर्धा स्कुल आॅलिम्पीक क्रीडा स्पर्धा घेवून क्रीडाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करू व मेजरध्यानचंद यांचे क्रिडा कार्य प्रत्येक शाळेत पोहचवू.जेणेकरून विद्यार्थी क्रीडास्पर्धेकडे वळतील येणाऱ्या काळात जिल्हयात मेजरध्यानचंद यांच्या नावाने मैदानी क्रीडा प्रशीक्षण केंद्र व दर्जेदार सैनिकी स्कुलची स्थापना करून खऱ्या अर्थाने मेजरध्यानचंद यांना अभिवादन करण्याचा अकॅडमीचे ध्येय व उध्दिश्ट आहे. 

 प्रा.डाॅ.महेश जाधव 

संस्थापक अध्यक्ष : मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी पुर्णा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या