🌟मी अस्वस्थ आहे...कोणाला काही मदत करण्याची संधीही प्रशांतनं दिली नाही - एस.एम.देशमुख


🌟अंबाजोगाई येथे जाऊन आम्ही प्रशांतच्या कुटुंबियांची भेट घेऊन एस.एम.देशमुख यांनी त्यांचं सात्वन केलं🌟

परळी येथील पत्रकार प्रशांत जोशी यांचं परवा निधन झालं..ताप आला, दोन दिवस तो अंगावर काढला.. तेवढंच निमित्त झालं.. अन पन्नाशीतला हा जिंदादील, अजातशत्रू पत्रकार आपल्याला सोडून गेला.. हे सारं एवढ्या झटपट घडलं की, कोणाला काही मदत करण्याची संधीही प्रशांतनं दिली नाही.


काल अंबाजोगाई येथे जाऊन आम्ही प्रशांतच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सात्वन केलं.. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आर्थिक मदतीचा चेकही दिला.. परंतू नंतर दिवसभर अस्वस्थत: माझा पाठलाग करीत राहिली.. कारण प्रशांतला मुलबाळ नव्हते.. त्यामुळं त्याच्या पत्नी, आमच्या भगिनीचं उत्तर आयुष्य कसं जाणार हा माझ्या चिंतेचा विषय होता.. प्रशांतचे बंधू सांगत होते, प्रशांतचं एका बॅंकेत खातं आहे, आणि त्यात किमान बॅलन्स आहे...हाती पैसा नाही, उत्पन्नाचं कोणतंच साधन नाही.. ग्रॅच्युइटी, प्रोव्हिटन्ट फंडाचा विषयच नाही.. नोकरीही नाही अशा स्थितीत भगिनीचं उर्वरित आयुष्य कसं जाणार हा विचार मन खिन्न करून टाकत होता..

प्रशांत जोशींचीच नाही, असंख्य पत्रकारांची हीच अवस्था आहे.. जगाच्या उठाठेवी करताना पत्रकारांचं स्वतःच्या कुटुंबाकडे, प्रकृतीकडे पूर्ण दुर्लक्ष होते....

--------------------------------------------------------------------

🌟दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी खरोखरच प्रामाणिक पत्रकार होते - मोहन चौकेकर


मा एस एम देशमुख सर माझे मित्र दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी खरोखरच प्रामाणिक पत्रकार होते. मी मोहन चौकेकर 1995,1996,1997 साली परभणी येथे दैनिक पुढारी व दैनिक मराठवाडा साथी या दोन्ही दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो तेव्हा प्रशांत जोशी परळी येथे दैनिक मराठवाडा साथीच्या मुख्य आॅफीसला शहर प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

 मराठवाडा साथीमध्ये काम करत असताना माझे कामानिमित्त नेहमी परळी येथे नेहमी जाणे येणे असायचे त्यामुळे प्रशांत जोशी हे माझे चांगले मित्र झाले होते.खरे तर प्रशांत जोशी यांची माझी पहिली भेट परभणी येथे 1990 मध्ये दैनिक सकाळने ठेवलेल्या पत्रकार प्रशिक्षण शिबिराच्या वेळी झाली होती  तेव्हापासून म्हणजे 1990 पासुन प्रशांतजी व माझी मैत्री होती या सकाळच्या पत्रकार प्रशिक्षण शिबिराच्या वेळी 1990 मध्ये मी परभणी येथे दैनिक देवगिरी तरुण भारतामध्ये शहर प्रतिनिधी काम करत होतो तर प्रशांत जोशी तेव्हा पण परळी येथे दैनिक मराठवाडा साथीमधेच शहर प्रतिनिधी म्हणून काम करत होते. सर प्रामाणिकपणे पत्रकारीता करणाऱ्या सर्वच पत्रकारांची घरची आर्थिक परिस्थिती खरोखरच खुपच खडतर व अवघड आहे ही  रास्त अशी वस्तुस्थिती आहे.सर प्रामाणिक पत्रकाराचे  स्वतः चे आयुष्य व कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य खुप खडतर व हालअपेष्टा सहन करण्यात व तुटपुंज्या पगारात व जाहिरातीमधुन मिळणाऱ्या उत्पन्नातून कसेतरी आयुष्यात तडतोड करण्यातच जात असते तसेच पत्रकारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ससेहाट, हालअपेष्टा होते ती निश्चितच विदारक अशी परिस्थिती सर्व प्रामाणिक पत्रकारांच्या कुटुंबीयावर ओढवते हे अंतिम असे सत्य आहे त्यामध्ये कुठेतरी बदल होणे आवश्यक आहे यासाठी पत्रकार संघटना सोबतच वर्तमानपत्राच्या मालक लोकांनी , संचालकांनी , व्यवस्थापकांनी त्याचप्रमाणे प्रामुख्याने केंद्र सरकारने व राज्य सरकारने व समाजाने देखील या साठी निश्चितच प्रयत्न केले पाहिजे आपलाच...

मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद

 बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या