🌟पुर्णा तालुका मराठी पत्रकार परिषदेने केला पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तिव्र निषेध...!


🌟तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून घटनेतील हल्लेखोरांवर कठोर कारवाईची केली मागणी🌟

परभणी/पुर्णा (दि.१२ आगस्ट २०२३) - जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी जिल्ह्यातील वातावरण तप्त असताना याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करीत विश्लेषणात्मक बातमी केली होती. यात त्यांनी आक्षेपार्ह बाबींचा उल्लेख केल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून शिवीगाळ करीत धमकावले होते या घटनेनंतर दि.०९ आगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ते आपल्या स्कुटीवर जात असतांना स्थानिक आमदार पाटील यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी भर रस्त्यात त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

या गंभीर घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात घडत असतांना आज शनिवार दि.१२ आगस्ट २०२३ रोजी पुर्णा तालुका मराठी पत्रकार परिषदेने देखील या पत्रकार संदीप महाजन हल्ला प्रकरणाचा तिव्र शब्दात निषेध नोंदवत तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून आमदार किशोर पाटील यांच्यासह त्यांचे हल्लेखोर समर्थकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या शिस्टमंडळाने तहसिलदार माधवराव बोथीकर यांचे प्रतिनिधी तथा नायब तहसिलदार प्रशांत थारकर व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक यांना देखील निवेदन देऊन पत्रकारांच्या तिव्र भावना प्रशासनाला कळवाव्यात अशी विनंती केली यावेळी शिस्टमंडळात पुर्णा तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले,सचिव गजानन हिवरे,शहराध्यक्ष केदार पाथरकर,कार्याध्यक्ष मुजीब कुरेशी,म.अलिम,संपत तेली,अनिस बाबूमियाँ,सतिष टाकळकर,मारोतराव ढाले आदींचा समावेश होता.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या