🌟यावेळी विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
परभणी (दि.०६ आगस्ट २०२३) : अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत आज परभणीतील चार रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी पायाभरणीचा कार्यक्रम रेल्वे स्थानक परिसरात पार पडला.
यावेळी विधान परिषद सदस्य विप्लव बाजोरिया,खा.संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार अमित घाडगे यांच्यासह माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी विधान परिषद सदस्य गोपिकिशन बाजोरिया, रेल्वेचे वोमसी कृष्णा, ख्रिस्तोफर, यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड आणि सेलू या रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सुविधांनी पुनर्विकास करण्यात येणार आहे पायाभरणी कार्यक्रमात खासदार संजय जाधव, माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.....
0 टिप्पण्या