🌟कै.रमेश वरपुडकर महाविद्यायाच्या प्राणिशास्त्र विभागाकडून जनजागृतीपर कार्यक्रम व ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन..!


🌟यामध्ये साथरोग निर्मुलनासाठी जनजागृती रॅली,वैज्ञानिक भित्तीपत्रकांचे प्रदर्शनसह विविध कार्यक्रम🌟


परभणी (दि.18 ऑगस्ट 2023) :- दर वर्षीप्रमाणे या वर्षी सोनपेठ येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने दि.19 ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत तीन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमासह व्याख्यानमालेच्या ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.राजधर टेमकर, प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते तर समन्वयक प्रा.डॉ. अतुल चौरपगार, प्रा. डॉ. तन्वीर पठाण, प्रा.डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. विठ्ठल मुलगीर यांनी केले आहे.

यामध्ये साथरोग निर्मुलनासाठी जनजागृती रॅली, वैज्ञानिक भित्तीपत्रकांचे प्रदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर परिक्षा आणि  तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील आदिनाथनगर पाथर्डी येथील दादा पाटील राजळे महाविद्यालय,बीड जिल्ह्यातील  शिरूर कासार येथील कालिका देवी महाविद्यालय आणि  परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय या तीन महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने  दि. १९, २० व २१ ऑगस्ट 2023 रोजी तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे  आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत खालील तज्ज्ञांचे बहुमूल्य विचार ऐकावयास मिळणार आहेत.

वर्ल्ड मॉस्किटो डे निमित्त दि. १९ ऑगस्ट रोजी डॉ. विनिता बाळ, व्हेक्टर बॉर्न डिसीजेस अँड रोल ऑफ इम्युनिटी, डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती दिनानिमित्त दि. २० ऑगस्ट रोजी डॉ. भालचंद्र कांगो, सायंटिफिक व्ह्यू ॲंड सोशल रिस्पोंसिबिलिटी. कै. राजाभाऊ कदम स्मृतिदिनानिमित्त व स्व. दादापाटील राजळे यांच्या जयंतीनिमित्त दि. २१ ऑगस्ट रोजी डॉ. मिलिंद आव्हाड, जेएनयू, नवी दिल्ली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० अँड रुरल एज्युकेशन सिस्टीम या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी  झुम मिटिंग आयडी: 836 2177 8260 संकेतांक: 792523 टाकून सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.संतोष रणखांब यांच्याशी (मो.9404241492) संपर्क साधावा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या