🌟औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या पत्रकाराची मुस्कटदाबी....!


🌟भारतीय स्वतंत्र दिनाच्या दिवशी पत्रकारांना अक्षरशः अट्टल गुन्हेगारा प्रमाणे वागणूक लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावर घाव🌟  

औरंगाबाद (दि.१५ आगस्ट २०२३) - संपूर्ण देशासह राज्यात सर्वत्र आज ७५ व्या आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपासह ७६ भारतीय स्वातंत्र्यता दिवस साजरा केला जात असतांना औरंगाबाद येथे मात्र शासकीय प्रशासकीय दंडेलशहांकडून लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाची मुस्कटदाबी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या विरोधात राजनिष्ठाचे संपादक मनिष अग्रवाल हे आज मंगळवार दि.१५ आगस्ट २०२३ रोजी लोकशाही मार्गाने रितसर लेखी स्वरुपात तत्पुर्वी अर्ज देऊन साडी चोळी देऊन आंदोलन करणार त्या आधीच त्यांचे समाधान करण्याऐवजी त्यांच्याशी पोलिसांनी एखाद्या अट्टल गुन्हेगार असल्यागत आरडाओरडा करत त्यांना आरेरावीची भाषा वापरत स्वतःहा कायद्याचा भंग करीत दादागिरी केल्याची लोकशाहीचा घात करणारी घटना घडल्यामुळे पत्रकारांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे. 


भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पोलीस लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणाऱ्या पञकार अशी वागणूक देत असतील तर या घटनेचा निषेध आहे. तसेच या पोलिसांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करु अशी धमकी देखील अग्रवाल यांना वेदांतनगर पोलिस स्थानकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिली शासकीय कामात अर्थळा आणल्या संदर्भातील कलम ३५३ चा शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून सर्रास गैरवापर होत असल्या बाबत नुकताच विधानसभेत प्रश्न गाजला असतांना देखील अधिकारी/कर्मचारी या कलमाचा गैरवापर पत्रकारांविरोधातच भाषा करीत असतील तर यापेक्षा मोठी लोकशाहीची शोकांतीका कोणती ? असा प्रश्न उपस्थित होत आहे जर कायदेशीर मार्गाने कुणी भुमिका घेत असेल तर अतिशय गंभीर बाब आहे. बेकायदेशीर घटना शासकीय कामात अडथळा केला नसताना गुन्हा दाखल करु अशी धमकी पोलीस देत असतील ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या वतीने निषेध. यावेळी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर दरेकर,  उन्नतीपत्र संपादक बाजीराव सोनवणे, बहुजन हिताय संपादक  बबन सोनवणे, जयभारती चे संपादक महेश मुरकुटे उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या