🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायतच्या अकार्यक्षम कारभारा विरोधात बातमी प्रकाशित करणे पडले महागात...?


🌟ताडकळस ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/ग्रामसेवकाकडून पत्रकारासह देशभक्त कुटुंबाचा मानसिक छळ ?🌟 

🌟लोकशाहीचे दमन करीत सुड उगवणाऱ्या ताडकळस ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी🌟


 
पुर्णा (दि.०७ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पत्रकार तथा २४✖️७ माझा महाराट्ट न्युज चायनचे प्रतिनिधी फेरोज़ मुनवर खान पठाण यांनी ताडकळस ग्रापंचायत प्रशासनाने मागील एप्रिल २०२३ या महिन्यात 'हर घर नल...हर घर जल' जलजिवन मिशन योजनेच्या नावाखाली ताडकळस गावातील रस्त्यांचे उत्खनन करीत संपूर्ण रस्त्यांवर खड्डे केल्यामुळे व व्यवस्थित रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम किंवा भर टाकून न बुजवल्यामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिकांना होणाऱ्या प्रचंड त्रासा संदर्भात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्या वृत्तवाहीनीवर दि.२३ जुलै २०२३ रोजी वृत्त प्रसारीत करुन ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला होता परंतु सदरील वृत्त प्रकाशित का केले ? असा प्रश्न उपस्थित करून ताडकळस ग्रामपंचायतचे सरपंच/उपसरपंच व ग्रामसेवक यांनी द्वेष भावनेतून पत्रकार फेरोज़ मुनवर खान पठाण यांच्यावरच सुड उगवण्यास सुरुवात केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून पत्रकार फेरोज पठाण यांचे कुटुंब अत्यंत देशभक्त व धार्मिक कुटुंब म्हणून संपूर्ण ताडकळससह तालुक्यात ओळखले जाते कारण त्यांच्या कुटुंबातील त्यांचे दोन सख्खे भाऊ भारतीय सैन्य दलात देशाच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असून त्यांचे वडील देखील पाच वेळ नमाज पठण करणारे एक धार्मिक व्यक्तीमत्व म्हाणून ओळखले जातात आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून मिळालेल्या सुसंस्कारातून पत्रकार फेरोज पठाण हे सातत्याने जनहीताशी बांधिलकी जोपासत पत्रकारीता करीत असल्यामुळे बेलगाम झालेल्या राजकीय दडपशहांकडून या कुटुंबाचा जाणीवपूर्वक मानसिक छळ होत असल्यामुळे शेवटी त्यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे,जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर. जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी परभणी,महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विस्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडे न्यायासाठी दाद मागावी लागल्याचे दिसत असून लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाची ही होणारी कुचंबना किती दुर्दैवी आहे याचा या प्रकरणावरून प्रत्यय येत आहे.


पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पत्रकार तथा येथील २४✖️७ माझा महाराष्ट्र न्युज चायनलचे पत्रकार फेरोज पठाण यांनी यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक परभणी,गृहमंत्री महाराष्ट्र यांच्यासह वरिष्ठांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मी जनसामान्यांच्या हिताला प्राक्षान्य देऊन जनहितवादी पत्रकारिता करतो काहीं दिवसापूर्वी मी २४✖️७ माझा महाराष्ट्र यूज चायनलच्या माध्यमातून ताडकळस येथील ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूका डोळयासमोर ठेवून एप्रिल २०२३ या महिन्यात गावातीस जल जिवन मिशन योजने अंतर्गत पाण्याची पाईप लाईन अंथरण्यासाठी मंजूर निधी प्राप्त होण्यापुर्वीच नियमबाह्य पध्दतीने गावातील रस्त्यांचे जेसीबीने उत्खनन केले होते. परंतु नंतर मात्र निवहणूका रद्द झाल्यामुळे सदरील पाईपलाईनचे खड्डे थातुरमातूर पध्दतीने बुजवले होते, ज्यामुळे संपूर्ण रस्त्यांचे खड्ड्यांमध्ये रुपांतर झालें होते. ज्या खड्ड्यांमध्ये आता मात्र पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गुडघ्यापर्यंत साचत असल्यामुळे या रस्त्यांवरून येणान्या जाणाऱ्या  शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी/वियार्थीनींना शाळा महाविद्यात तसेच धर्मस्थलामध्यें जाणाऱ्या येणाऱ्या धार्मिक लोकांना, परिसरातील आबाल वृध्दांना,महिलांना रहदारीसाठी प्रचंड त्रास होत असल्यासंदर्भात पुराव्यानिशी मी जनहितार्थ वृत्त प्रसारित केले होते. प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन ताइकळस ग्रामपंचायतने बत्याच ठिकाणी रस्त्यांवर मुरूम टाकून चिखलमय झालेल्या रस्त्यां रहदारीसाठी नागरिकांना चालण्यायोग्य रस्ते करून दिले,


परंतु माझ्या परिसरात मात्र आमच्या विरोधात वातमी का प्रसारित केली याचा द्वेष मनात ठेवून जाणीवपूर्वक सरपंच, उपसरपंच प्रभारी तसेच ग्रामसेवक यांच्या संगनमताने आपस्या पदाचा गैरवापर करत माझ्या घरासमोरील रस्त्यावर टाकलेला मुरूम पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने उचलून नेण्यात आला माझ्या जनहितवादी पत्रकारितामुळे मला माझ्या  कुटुंबाला तसेच परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे तसेच परिवारातील दोन बंधू देश सेवेसाठी भारतीय सैन्य दलात कर्तव्य वजावत आहेत माझे वडील धार्मिक वृत्तीचे आहेत आम्ही अल्पसंख्यांक समाजातले असल्याचे त्यांनी नमूद केले असून त्यांनी दिलेल्या अर्जात असेही नमूद केले आहे की ताडकळस येथील सरपंच उपसरपंच माझ्यासह माझ्या कुटुंबाला धमकावत आहेत सरपंचांचे परभणी जिल्ह्यातील मोठमोठया नेत्यांसोबत हितसवंध असल्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे त्यामुळे ताडकळस ग्रामपंचायतचे सरपंच/उपसरपंच यांच्यासह ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर कुरून केलेल्या दुष्कृत्याची सखोल चौकशी कंरून लवकरात त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असेही निवेदनात पत्रकार फेरोज पठाण यांनी म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या