🌟पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कौतुकास्पद उपक्रम : डासांचा नायनाट करण्यासाठी जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते धुर फवारणी....!


[धूर फवारणीचा शुभारंभ करताना जगदीश जोगदंड यावेळी अभियंता किरण गुट्टे,उत्तम कांबळे,दिपक भालेराव

🌟जेष्ठ पत्रकार तथा सामाजसेवक जगदीश जोगदंड यांच्या हस्ते धुरफवारणीचा शुभारंभ🌟

पुर्णा (दि.३० आगस्ट २०२३) - पुर्णा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना मलेरीया काविळ डेंग्यू सारख्या जिवघेण्या संसर्गजन्य आजारापासून वाचवण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने शहरात सर्वत्र धूर फवारणीला सुरूवात केली आहे. अशी माहिती नगर परिषदेचे प्रशासक तथा गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.    

पुर्णा शहरातील तापीची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक जीवराज डापकर व मुख्याधिकारी  युवराज पौळ यांनी संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्याचे नियोजन केले. जगदीश जोगदंड यांच्या हस्ते धूरफवारणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभियंता किरण गुट्टे व स्वच्छता निरीक्षक उत्तम कांबळे , दीपक भालेराव उपस्थित होते. फवारणी पथकात श्यामपाल सौदा, नागेश खंदारे, महेश रापतवार व गौतम नन्नवरे यांचा समावेश आहे. फवारणी साठी मुबलक औषधी साठा उपलब्ध आहे. सायंकाळच्या वेळेत धूर फवारणीचे काम करावे लागते त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अभियंता किरण गुट्टे व स्वच्छता विभाग प्रमुख उत्तम कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या