🌟राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज परभणी शहरात....!


🌟उपमुख्यमंत्री पवार हे दुपारी २:१५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील🌟

परभणी (दि.२६ ऑगस्ट २०२३): उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज रविवार दि.२७ रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार येथील राज्य शासनाच्या नियोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 


उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक‍ मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विमानाने पुणे येथून सकाळी ९:४५ वाजता नांदेडकडे प्रयाण करतील. नांदेड येथून सकाळी १०:२५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेड येथे आगमन होईल.  त्यानंतर ते १०:४० वाजता परभणीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. त्यानंतर त्यांचे परभणी येथे सकाळी ११:१० वाजता पोलीस परेड मैदानावर आगमन होईल. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ग्रीष्म वसतिगृह (दगडी वसतिगृह) समोरील मैदान वसंतराव नाईक‍ मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल ‘शासन आपल्या दारी’च्या कार्यक्रमस्थळी सकाळी ११:३० वाजता मोटारीने आगमन होईल. दुपारी १:३० ते २ वाजेपर्यंत वेळ राखीव असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुपारी २:१०  वाजता मोटारीने पोलीस परेड मैदान येथील हेलीपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी २:१५ वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या