🌟हिगोली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण प्रकरणी हिंगोली पोलिसांनीही केला खुलासा केला....!


🌟एका आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला : मोबाईलचा सीडीआर तपशीलवार तपासल्यानंतर अनेक माहिती आली समोर🌟


हिंगोली (०२ ऑगस्ट २०२३) - हिंगोली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर काल मंगळवार दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा परिषद प्रांगणात झालेल्या जिवघेण्या गोळीबार प्रकरणा संदर्भात हिगोली जिल्हा पोलिस प्रशासनाने आज बुधवार दि.०२ ऑगस्ट रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. 

 हिंगोली पोलिसांनी सांगितले की भाजयुमो नेते पप्पू चव्हाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर एका आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला त्या मोबाईलचा सीडीआर तपशीलवार तपासल्यानंतर अनेक माहिती समोर आली आरोपी अक्षय इंदोरिया,ओम पवार,सत्यम देशमुख,अजिंक्य नायक आणि अल्पवयीन यांच्यातील फोनवरील संभाषण रेकॉर्ड तपासण्यात आले आहे.पाचही आरोपींमधील संभाषणात दोन महिन्यांपूर्वी पप्पू चव्हाण याने मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया याला प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण केल्याचे समजते.  याचा बदला घेण्यासाठी अक्षय इंदोरिया याने त्याच्या अन्य चार साथीदारांसह हा कट रचला आहे आरोपींमध्ये ओम पवार हा पप्पू चव्हाणचा नातेवाईक आहे आणि खुद्द पप्पू चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे अटॅक एपिसोडमध्ये सतत ट्विस्ट येत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या