🌟राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांचा परभणी दौरा फक्त अडीच तासांचा....!

🌟कार्यक्रम संपल्या नंतर मा.खा.शिवसेना संपर्क प्रमुख ॲड.सुरेश जाधवांच्या वसमत रोडवरील निवासस्थानी देणार भेट🌟

परभणी (दि.२६ ऑगस्ट २०२३) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाई  एकनाथ शिंदे हे उद्या रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी परभणी  शहरात 'शासन आपल्या दारी' या उपक्रमा अंतर्गत आयोजित कार्यक्रमासाठी परभणी दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री शिंदे यांचा हा धावता दौरा केवळ अडीच तासांचा राहणार आहे.


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईतून विमानाने नांदेडला येवून तेथून हेलिकॉप्टर द्वारे सकाळी ११-१० वाजेच्या सुमारास परभणीत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दाखल होणार आहेत. तेथून ते कृषी विद्यापीठातील या विशेष कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम आटोपल्या बरोबर ते परभणी जिल्ह्याचे मा.खासदार तथा शिवसेना परभणी जिल्हा संपर्क प्रमुख ॲड.सुरेश जाधव यांच्या वसमत रस्त्यावरील निवासस्थानी २० मिनिटे भेट देणार असून तेथून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुपारी ०२-१५ वाजता दाखल होणार असून या ठाकाणाहून हेलिकॅप्टर द्वारे नांदेड कडे प्रस्थान करणार आहेत.लगेच विमानाने ते मुंबईस रवाना होणार आहेत मुख्यमंत्री शिंदे यांचा हा अडीच तासांचा दौरा असणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या