🌟विविध विभागांतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सन्मान...!


🌟हा कार्यक्रम शहरातील गुरु गोविंदसिंघपुरा येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात पार पडला🌟


✍️मोहन चौकेकर 

संभाजीनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त व शिवसेना शाखाप्रमुख नितीन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथील शासकीय व निम्न शासकीय अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजता हा कार्यक्रम शहरातील गुरुगोविंदसिंहपुरा येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात पार पडला.नितीन पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी शिवसेना नगरसेवक गिरजाराम हाळनोर,उपशहरप्रमुख अनिल लहाने व विभागप्रमुख अभिजीत पगारे उपस्थित होते.

आपल्यासारख्या निष्कलंकपणे संपूर्ण सेवेच्या कार्यकाळात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणे हे माझ्यासाठी खुप मोठे भाग्य आहेत.जनतेची पूर्ण समर्पण भावनेने आपण सेवा केली,याचा मला सार्थ अभिमान आहेत.सेवेच्या काळात कुटुंबाकडे आपल्याला लक्ष देणे झाले नसेल,अनेकदा आपण पारिवारिक महत्वपूर्ण क्षणापासून दूर राहिला असेल त्यांची भरपाई आता या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या काळात करून घ्या,असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थिताना दिला.

याप्रसंगी दानवे यांनी नायब तहसीलदार नंदकुमार कुरूद,सहाय्यक पोलीस नामदेव चव्हाण, महावितरण सत्यनारायण अग्रवाल,परिवहन महामंडळ लक्ष्मीनारायण रोडीया,सईद भाई,शेख खलील शेख कासम,सांस्कृतिक मंडळ बाबुराव तुपे,ऑग्रीकल्चर शिवाजी बिराजदार,जलसंपदा मोहन पुर्णपात्रे,वनखाते मनोहर म्हाडीक, विभागीय आयुक्त शेख अहेमद,परिवहन महामंडळ राजेंद्र सिंह परदेशी, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी अरुण महातोले,केंद्रीय शुल्क उत्पादन खाते अनंत जाधव, उच्च व माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ सत्यनारायण वाघमारे, कंपनी रामदास सूर्यवंशी, भारतीय सैन्य सुबेदार अदिनाथ शिंदे, महाराष्ट्र बँक मॅनेजर अनंत जोशी, सांस्कृतीक मंडळ प्रकाश बहादुरे,महाराष्ट्र पोलीस जिवन सिंग बंड, सुरेश गायकवाड,साईनाथ म्हाडीक, उच्च न्यायालय धनराज खरे, बँक राजु भालेराव,  पंचायत समिती प्रकाश दाभाडे, सार्वजनिक बांधकाम मुस्तफा खान उमर खान बाबुभाई, उच्च न्यायालय शेख रशीद शेख नुर,शेख नवाब शेख इमाम,युनियन बँक छोटु बेग, महावितरण भाऊसाहेब कचकुरे, शासकीय मुद्रालय अहेमद खान महेबुब खान, जिल्हा परिषद इब्राहीम खान, सीआयडी अब्दुल मारूफ भाई, महावितरण मोईन भाई, रामा इंटरनॅशनल शेख जाहेद शेख भुरे व सार्वजनिक बांधकाम विभाग अब्दुल करिम खान यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील गायकवाड,दीपक शिंदे , दीपक क्षीरसागर,बापू जहागीरदार, सुभाष बहादूरे ,बाळू मगर, गणेश बहादूरे, असद बेग, पवन रौतले, जगदीश लव्हाळे ,राज गोसावी, सोनू सरांडे, महेश सूर्यवंशी,किरण यादव, कन्हैया गडप्पा, योगेश बनकर, आनंद यादव, धनराज यादव, हृषिकेश हाडे पाटील, कमलेश खोबरे,सचिन पवार, विजय नरसाळे, मोहित जैस्वाल, विशाल महतोले,  संकेत कलंत्री, किशन मगर, मयूर तुपे, मोहित बहादूरे , सोनू बहादूरे, सनी  बहादूरे, किरण बहादूरे, केतन खरटमल, यश करपे व अभिषेक तुपे यांनी परिश्रम घेतले.                     

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या