🌟पुर्णा तालुक्यातील प्रती हजारे जेष्ठ समाजसेवक महेबुब कुरेशी यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरूवात.....!


🌟माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या न.पा. अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाईसह केल्या विविध मागण्या🌟 

      


पुर्णा (दि.११ आगस्ट २०२३) :- पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रती हजारे म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ समाजसेवक तथा मा.नगर सेवक महेबुब साहेब कुरेशी यांनी पुर्णा नगर परिषद प्रशासनातील भ्रष्ट बेबंदशाही विरोधात यल्गार पुकारला असून पुर्णा नगर परिषदेती मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्यासह अन्य अधिकारी/कर्मचारी सातत्याने जन माहिती अधिकार अधिनियम - २००५ या कायद्याची पायमल्ली करुन नगर परिषदेतील भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याची प्रयत्न करीत असल्यामुळे संतप्त जेष्ठ समाजसेवक महेबुब साहब कुरेशी यांनी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व मागेल त्याला माहिती द्यावी या मागणीसह शहरातील विविध मागण्यांसाठी काल गुरुवार दि.१० ऑगस्ट २०२३ पासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत लक्षणिक उपोषण सुरूवात केली आहे.


जेष्ठ समाजसेवक महेबुब साहब यांच्या बेमुदत लाक्षणीय उपोषणाला आज शुक्रवार दि.११ आगस्ट रोजी दुसरा दिवस असतांना देखील नगर परिषद प्रशासनातील बेजवाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी ८२ वर्षीय वृध्द जेष्ठ समाजसेवक महेबुब साहब यांच्या या आंदोलनाची कुठलीच दखल घेतली नसून संबंधित बेजवाबदार मुख्याधिकारी पौळ हे देखील या आंदोलनाकडे फिरकले देखील नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.पुर्णा नगरपरिषद प्रशासना अंतर्गत होणाऱ्या विविध विकासकामांसह विविध शासकीय योजनांसंदर्भात माहिती अधिकार अधिनियम कायद्यान्वये माहिती मागितल्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते इतकेच नव्हे तर माहिती मागणाऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याचा निर्लज्ज सल्ला देखील नगर परिषदेतील भ्रष्ट बेलगाम बेबंदशाहांकडून दिला जात असल्यामुळे भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी भ्रष्ट गुत्तेदार भ्रष्ट आजी/माजी लोकप्रतिनिधी यांची एक प्रकारे मजबूत साखळीच तयार झाल्याचे दिसत आहे.

पुर्णा शहरात प्रधानमंत्री आवास रोजना,रमाई घरकूल योजने अंतर्गत २०१९/२० या कालावधीत मंजूर झालेल्या यादीतील ज्या घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम चालू आहे या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचा उर्वरित निधी नगर परिषद प्रशासनासह संबंधित योजनांचे गुतेदार देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे घरकुल लाभार्थ्याचे बांधकाम अक्षरशः रखडले आहेत तेव्हा वरील लाभार्थ्यांना नियमित निधी देण्यात यावा व त्यांची रखडलेली कामे पूर्ण करावी तसेच घरकुल योजनेचा निधी वाढवून ०५ लाख रुपयें करण्यात यावा, शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या भिंती लगत जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे आणि तेथील धर्मशाळेची बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांना राहण्यासाठी सुधारणा करावी अर्थात अनेक दशकापुर्वीचा मुसाफिर खाना त्वरित पुनर्वत चालू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जेष्ठ समाजसेवक महेबुब साहब कुरेशी लाक्षणीय उपोषणास काल गुरुवार दि.१० आगस्ट २०२३ पासून नगर परिषद प्रशासकीय इमारती समोर बसले असतांना देखील नगर परिषदेतील भ्रष्ट बेबंदशाह त्यांच्या लाक्षणीय उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या