🌟नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील किवळा येथील तृतीय पंथीय भीमाशंकर कांबळेचे एक पाऊल पुढे.....!


🌟अधिकारी बनण्यासाठी तलाठी पदाची दिली परिक्षा🌟 

नांदेड : समाजात तृतीय पंथीयांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शासकीयस्तरावरुन वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे, पण आज ही समाजात तृतीय पंथीयांना वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. रस्त्यावर टाळ्या वाजवून आपला उदरनिर्वाह करत असतात, मात्र आता सन्मानाने जगण्याच काम तृतीयपंथीय करताना दिसत आहेत. राजकीय असो किंवा शासकीय सेवा यासाठी तृतीय पंथीय आता पुढे येताना दिसत आहेत. त्यातच भीमाशंकर कांबळे या तृतीय पंथीने एक पाऊल पुढे टाकत अधिकारी बनण्यासाठी तलाठी परिक्षा दिली आहे.


भीमाशंकर कांबळे (वय २९ ) हा मूळ लोहा तालुक्यातील किवळा येथील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अशा परिस्थितीत त्याने किवळा येथे दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात बारावी आणि नंतर मुक्त विद्यापिठातून पदवी प्राप्त केली. टाइपिंग, टॅली, एमएस सीआयटी देखील पूर्ण केलं आहे. दरम्यान शिक्षण पूर्ण करत असताना त्याला अनेक नाहक त्रास सहन करावा लागला. तृतीय पंथी असल्याने समाजाने त्याला हिनवलं. एवढचं नाही तर घरच्यानी भीमाशंकर याला हाकलून लावले होते. मागील सहा वर्षापासून भीमाशंकर हा हडको येथील राहुल नगर येथे ८ बाय ८ च्या खोलीत राहत आहे. सुरुवातीला टी रस्त्यावर टाळ्या वाजवून भीक मागायची. कोणी पैसे देत होते तर कोणी पैसे देत नव्हते. लोकांचे बोलणे देखील खावं लागत होते. त्यामुळे आपल्याला मोठ अधिकारी बनायच आहे हे स्वप्न डोळ्या समोर ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यासाठी तृतीय पंथीयाचे गुरु फरीदा बकस यांचे मार्गदर्शन घेतले.तुतीयपंथी याचावर काम करणारी कमल फाउंडेशननी मदत केली,रविवारी भीमाशंकर याने तलाठीची परिक्षा दिली आहे.या पूर्वी  हनवंते याने पोलीस भरतीची परीक्षा दिली आहे. लेखी परीक्षेत तो उत्तीर्ण देखील झाला आहे. तसेच अमोल सर्जे या तृतीय पंथीयाने देखील बारावी परीक्षा उत्तीर्ण झालं आहे. माझ्या सारख्या इतरांनी देखील स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नकरावे असा संदेश भीमाशंकर याने दिला आहे. नांदेड मध्ये दोन शे तृतीय पंथीय आहेत. अनेक तृतीय पंथीय उच्च शिक्षीत आहेत . पण आज ही अनेक जण  रस्त्यावर टाळ्या वाजवून भीक मागवून उदरनिर्वाह करत असतात. सेजल बकस हा सेतू केंद्र चालवत अनेकांना रोजगार मिळून दिलं आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या