🌟परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या रावराजूर येथील गोदावरी नदीपात्रात महसुल प्रशासनाची धाडसी कारवाई...!


🌟महसुल प्रशासनाने अवैध रेती उत्खननासाठी वापरल्या जाणारे दहा तराफे जाळले🌟


परभणी/पालम (दि.२९ आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील रावराजूर येथील गोदावरी नदीपात्रात आज मंगळवार दि.२९ आगस्ट २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास महसुल प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व चोरट्या रेती तस्करी विरोधात धाडसी कारवाई करीत रेती उत्खननासाठी वापरले जाणारे तब्बल १० तराफे जाळून भस्मसात केले.

या कारवाई वेळी मंडळ अधिकारी राजकुमार चिकटे,तलाठी डांगे,तलाठी आमदरे,श्री खाडे,इस्माईल,कोतवाल कांबळे,जाधव,चव्हाण,लोंढे व पोलिस कर्मचारी आदींची उपस्थिती होती...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या