🌟राष्ट्रीय सेवा योजना युवकांसाठीचे ऊर्जा स्त्रोत - प्रा.अरुण पडघन


🌟राष्ट्रीय सेवा योजना हे युवाशक्तीला सुंदर व समृध्द अशी दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे ही ते म्हणाले🌟

राष्ट्रीय सेवा योजना युवकांचे सुंदर संघटन असून, युवक लोकहितासह राष्ट्रहिताची जोपासना करीत आदर्श समाज बांधणीचे कार्य आपल्या सेवा समर्पणातून करीत आहे. या कामी स्वामी विवेकानंदांचे विचारांचा मूलमंत्र असणारे राष्ट्रीय सेवा योजना हे युवाशक्तीला सुंदर व समृध्द अशी दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन,कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन यांनी व्यक्त केले.

      कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी येथे सांस्कृतिक विभाग आणि रासेयो विभाग आयोजित ओळख तुमची आमची या कार्यक्रमात प्रा.अरुण पडघन बोलत होते.भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि युवा या विषयी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन यांनी विद्यार्थीनींना रासेयोच्या उपक्रमां विषयी माहिती दिली.

      युवकांनी रासेयोच्या माध्यमातून अधिक सजगपणे जनजागरणाचे कार्य करावे,असे आवाहन प्रा.डॉ.नसिम बेगम यांनी केले.यावेळी ९७ विद्यार्थीनींसह प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या