🌟पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटे सक्रिय : भुरट्या चोऱ्यांसह आता वाहन चोरीच्या घटनाही घडू लागल्या...!


🌟तालुक्यातील सुहागन येथून अज्ञात चोरट्याने पळवली शाईन कंपनीची मोटार सायकल🌟 

पुर्णा (दि.०६ ऑगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील ग्रामीत भागातील गाव खेड्यांमध्ये चोरट्यांनी हळुवारपणे डोके वर काढण्यास सुरुवात केली असून शेत आखाड्यांवरील शेती अवजार तसेच विहिरींवरील  विद्युत मोटारींच्या चोरींसह आतातर दुचाकी वाहन देखील चोरटे पळवू लागल्याने ग्रामीण भागात खळबळ माजल्याचे निदर्शनास येत असाच प्रकार तालुक्यातील मौ.सुहागन येथे आज रवावार दि.०६ ऑगस्ट २०२३ रोजी घडला मध्यरात्री १२ ते ०३-०० वाजेच्या दरम्यान सुहागण येथील दौलत बळीरामजी भोसले यांच्या घरा समोरून अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम.एच.२२ एएच ७६६६ चोरून नेल्याची गंभीर घटना घडली.


तालुक्यातील सुहागन,बरबडी,देगाव,आडगाव,धनगर टाकळी,भाटेगाव परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत असून शेतकऱ्यांच्या विद्युत वरील मोटर स्टार्टर वायर रात्रीला चोरीला जात आहेत गेल्या दोन महिन्यापासून चोराने थैमान घातले असून शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे तरी चोरांच्या मुस्क्या आवळून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे  पूर्णा पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली असून अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या