🌟आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे


🌟शिक्षकाला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज पडते यासारखे दुर्दैव नाही🌟 

मुंबई (दि.२३ ऑगस्ट २०२३) - आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व कर्मचारी हे एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलनाला मुंबईत आझाद मैदानात येथे आज बसले होते.  या आंदोलनकर्त्यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  भेट घेतली. या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

    भगवी व लाल टोपी एकत्र आल्यास आपोआप परिवर्तन होईल. शिक्षकाला रस्त्यावर उतरण्याची गरज पडते यासारखे दुर्दैव नाही. शिक्षकाच महत्त्व आज अबाधित असून शिक्षकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेन. अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी न लावल्यास मुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न मांडेल.  तसेच सामान्य शाळांप्रमाणे आश्रम शाळांनाही नियम लागू करावा यासाठी प्रयत्न करेल , असे आश्वासन दानवे यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना दिले.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या