🌟गौसखान पठाण धमकी प्रकरणी कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी....!


🌟पत्रकारांवरील हल्ले धमकी देण्याचे प्रकार चिंतनीय बाब🌟

सोलापूर (दि.२९ आगस्ट २०२३) - सुधागड जिल्हा रायगड येथील दैनिक रायगड न्यूज चे संपादक गौस खान पठाण यांना धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली आहे या धमकी प्रकरणी गौसखान पठाण यांनी  पाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून पत्रकार गौसखान पठाण यांना माघारी पाठवण्यात आले आहे काही दिवसापूर्वी सकाळी शालेय बस मधून फी न भरलेल्या  मुलाला उतरवित असताना पत्रकार गौस खान पठाण यांनी या बाबत विचारणा केली असता तुम्ही यामध्ये पडू नका अशी विनंती अशी विनंती मोटर चालकाने केली होती काही महिन्यापूर्वी पत्रकार गौसखान पठाण यांनी राठोड यांच्या बाबतीत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्या बातमीचा राग मनात धरून  रायगड न्यूज चे संपादक गौसखान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पत्रकारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न पत्रकारांसमोर निर्माण झाला आहे,

* पत्रकारांवरील हल्ले धमकी देण्याचे प्रकार चिंतनीय बाब :-

 हल्ली महाराष्ट्र राज्यात रोज कोठे ना कोठे पत्रकारांवर वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया त्याचबरोबर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बातमी लावण्यावरून  जीवघेणा हल्ला मारहाण धमकी दिली जात असून सदरची बाब पुरोगामी महाराष्ट्राला  शोभणारी नाही   मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून  पत्रकार गौसखान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी  अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या