🌟गंगाखेड तालुक्यात ज्यादा दराने खत व औषधे विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करा...!


🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनाद्वारे मागणी🌟

गंगाखेड (दि.०१ आगस्ट २०२३) - शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून शेतातील मशागतीची कामे चालू असताना खत व औषध विक्रेते चढ्या भावाने विक्री करत आहेत यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.   

 गंगाखेड तालुक्यातील औषध विक्रेते मनमानी भावाने खत व औषध विकत आहेत शेतकऱ्यांना आर्थिक बाजूस सामोरे जावे लागत असल्याने संबंधित खत व औषधी विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत व कार्यवाही करण्याची मागणी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कृषी अधिकारी यांनी औषध विक्रेत्यांसोबत बैठका घेऊन सूचना देण्यात येतील अन्यथा कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष यादव महात्मे तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे शहराध्यक्ष आकाश जामगे निखिल राठोड गजानन भूसणार माधव भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या