🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १.१ मिलिमीटर पावसाची नोंद...!


🌟औरंगाबाद विभागात सरासरी १.६ मिलिमीटर पाऊस पडल्याची‌ नोंद🌟 

 परभणी (दि.२४ ऑगस्ट २०२३) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १.१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यात ३.१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर सोनपेठ १.७, पालम तालुक्यात १.४ मि.मी. पाऊस झाला असून, सेलू ०.२ आणि पुर्णा ०.१ मि.मी. पाऊस पडल्याचे वगळता गेल्या २४ तासात परभणी, पाथरी आणि मानवत हे तीन तालुके पावसाअभावी कोरडे राहिले आहेत. तर औरंगाबाद विभागात सरासरी १.६ मि.मी. पाऊस पडल्याची‌ नोंद झाली आहे....

 *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या