🌟हिंगोली जिल्ह्यातील कुपटी तालुका कळमनुरी येथील माझी पोलीस पाटील निवृत्तीराव नरवाडे यांचे दुःखद निधन....!


🌟त्याच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,नातू बंधू असा मोठा परिवार आहे🌟 

हिंगोली (दि.३१ आगस्ट २०२३) - हिंगोली जिल्ह्यातील कुपटी तालुका कळमनुरी येथील माझी पोलीस पाटील निवृत्तीराव विठ्ठलराव नरवाडे यांचे अपघाती निधन झाले.

दि ०७ ऑगस्ट २०२३ रोजी आखाडा बाळापूर येथील सरकारी दवाखान्या समोरील मुख्य रस्त्यावर अपघात झाला.सायकल वरील निवृत्तीराव नरवाडे यांना सुसाट वेगाने धावणाऱ्या मोटारसायकल स्वाराने धडक दिली होती या भयंकर अपघातात ते गंभीर जखमी झाले होते दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले त्याच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, नातू बंधू असा मोठा परिवार आहे त्याच्या पार्थिवावर कुपटी येथे अतिंमसंस्कार करण्यात आला ते वैद्यकीय अधिकारी डॉ गणपतराव नरवाडे याचे भाऊ,न्यायालयन कर्मचारी मिलींद नरवाडे याचे वडील,माजी सरपंच अरुण नरवाडे याचे चुलते,आखाडाबाळापूरचे सरपंच भीमाबाई नरवाडे याचे चुलत सासरे होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या