🌟पुर्णा तालुक्यात सामाजिक/पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल सुशिल गायकवाड व कुंदन ठाकूर यांचा सन्मान...!


🌟औरंगाबाद येथे राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन दोघांना करण्यात आले सन्मानीय🌟


पुर्णा (दि.०४ आगस्ट) :- सामाजिक/राजकीय/पत्रकार क्षेत्रात सर्वसामान्य जनतेशी निस्वार्थपणे बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक एकमतचे पत्रकार सुशिल गायकवाड व सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध जनहीतवादी उपक्रम राबवणारे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते कुंदनसिह उर्फ राणा ठाकून यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचा सन २०२२/२३ या वर्षाचा 'समाज गौरव पुरस्कार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर मध्ये आयोजित  कार्यक्रमात दि.०२ ऑगस्ट २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा मानाचा 'समाज गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सय्यद साबेर सय्यद सरदार तर प्रमुख पाहुणे म्हणुन घाटी शासकीय रुग्णालय येथील विशेष उपचार डॉ. सुधीर चौधरी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख शफिक अहमद हे होते जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष शेख युसुफ तालुकाध्यक्ष चंद्रमणी लोखंडे कुंदन ठाकूर सुमित गायकवाड आदीची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या