🌟तृतीय पंथीयांसाठी कल्याणकारी बोर्डाच्या स्थापनेसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सरकारकडे करणार पाठपुरावा....!


🌟आज काही तृतीयपंथींनी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या विधानभवनातील दालनात भेट घेतली🌟

मुंबई (दि.२३ ऑगस्ट २०२३) - राज्यात तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली, मात्र अद्याप ते महामंडळ अस्तित्वात न आल्याने हे महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे या मागणीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुढाकार घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. 

तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी महामंडळ लवकरात लवकर स्थापित करावे या मागणीसाठी आज काही तृतीयपंथींनी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या विधानभवनातील दालनात भेट घेतली या भेटीत त्यांचे प्रश्न, समस्या याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी  समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवून आणली यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर अध्यक्ष व सारथी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. डॉ.पवन यादव, गुरू शोभा नायकजी, एम निषाद,सना, वासवी त्रिवेणी समाज,अमृता, रेणुका, शिल्पा, संगीता चटलानी आदी उपस्थित होते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या