🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली पंचप्रण शपथ....!


🌟'मेरी मिट्टी, मेरा देश' उपक्रमाला आजपासून प्रारंभ🌟


परभणी (दि.०९ ऑगस्ट २०२३) : केंद्र शासनाच्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला असून, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सकाळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पंचप्रणाची शपथ दिली.अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रदीप जगताप, तहसीलदार सुरेश घोळवे, अमित घाडगे, श्रीराम बेंडे, आर. एन. पवळे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, शेख वसीम यावेळी उपस्थित होते.


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येत असून, जिल्ह्यात आज महानगरपालिकेसह नगर पालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे तत्पूर्वी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सकाळी शहरातील राजगोपालचारी उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले. मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, तहसीलदार अमित घाडगे आणि मनपाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 


जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या शिलाफलकाची उभारणी करून या शिलाफलकावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हीजन २०४७ चा संदेश, शहीद विरांची नावे कोरण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित वीरपत्नींचा शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाची आजपासून सुरुवात केली. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६४२ ठिकाणी शिलाफलक लावण्याचे काम सुरू आहे. तसेच ७०४ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटीकांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ४३९ राष्ट्रध्वज जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असून, भारतीय डाकघरामध्ये नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या