🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा....!


🌟याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण🌟 

पुर्णा (दि.१५ आगस्ट २०२३) प्रतिनिधी  - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात   स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. 

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले तसेच याप्रसंगी औंढा नागनाथ येथील महाविद्यालयात झालेल्या परभणी जिल्हा "" झोन योगा स्पर्धेत महाविद्यालयाने व्दितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सहभागी विद्यार्थींचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संगीत विभागाच्या प्रा. सुजाता घन यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या