🌟भारतीय डाक विभागातर्फे "दीनदयाल स्पर्श योजना" फिलाटेली शिष्यवृत्ती योजनेचे आयोजन....!


🌟निवडक विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी रुपये सहा हजार रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार🌟

परभणी : भारतीय डाक विभागातर्फे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी " दीनदयाल स्पर्श योजना " फिलाटेली शिष्यवृत्ती सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा तसेच तिकिटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांची डाक विभागातर्फे "फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि "फिलाटेली प्रकल्प" या आधारावर निवड करून मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. निवडक विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी रुपये सहा हजार रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे.

तरी सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सदरील योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधिक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या