🌟परभणी जिल्ह्यात 'घरोघरी तिरंगा' मोहीम राबवा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी🌟

परभणी (दि.१२ ऑगष्ट २०२३) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येणा-या उपक्रमात 'घरोघरी तिरंगा'चा समावेश असून, नागरिकांनी आपापल्या घरी तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

या उपक्रमांतर्गत दि. १३ ते १५ ऑगष्ट २०२३ या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सूचनेनुसार 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचे अनुषंगाने सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी. त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातही 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांनी इमारती व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या