🌟परभणी जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत पावणे नऊ लाख लाभार्थ्यांना दिड हजार कोटींचा लाभ....!


🌟जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली माहिती🌟  

परभणी (दि.२५ आगस्ट २०२३) : परभणी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध विभागामार्फत एकूण ०८ लाख ७४ हजार ७३८ लाभार्थ्यांना ०१ हजार ४४६ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज शुक्रवार दि.२५ आगस्ट २०२३ रोजी एका पत्रकार परिषदेत दिली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतील ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी गावडे यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून शासन आपल्या दारी या उपक्रमातून या जिल्ह्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांविषयी माहिती दिली १५ एप्रिल २०२३ पासून या जिल्ह्यात राबविलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत विविध विभागामार्फत एकूण ०८ लाख ७४ हजार ७३८ लाभार्थ्यांना ०१ हजार ४४६कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला असे ते म्हणाले.

          रविवार दि.२७ आगस्ट २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री तानाजी सावंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात २० लाभार्थ्यांना व्यासपीठावरुन विविध योजनांचा लाभ बहाल करण्यात येणार असून गेल्या दोन महिन्यातील ०१ हजार २४० लाभार्थ्यांना स्टॉल्सच्या माध्यमातून लाभ दिला जाईल, अशीही माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या