🌟मैत्रीचं नातं जपणाऱ्या दोन्ही मित्रांवर टिकून असतं.....!


🌟मैत्रीत कोणीच मोठे नसते कोणी लहान नसते🌟

मैत्रीचं नातं जपणाऱ्या दोन्ही मित्रांवर टिकून असतं...कुणी एकानं येणं जाणं बंद केलं म्हणून दुसऱ्यानं पावलं रोखून धरायची नसतात.

प्रवास दोन्हीकडून सुरू राहिला पाहिजे... कधीच

नेहमी सुदामाच पोहे घेऊन आला नाही प्रभू श्रीकृष्ण देखील  मैत्री निभावताना कमी पडले नाहीत...

मैत्रीत कोणीच मोठे नसते. कोणी लहान नसते.

वेळ प्रसंगी दोघानाही दोन पावलं मागे घेणे बंधनकारक असते. तीच मागे घेतलेली दोन पावलं मैत्रीच्या अखंड प्रवासाला वेगवान बनवतात...

अनेकजण मित्रांशी बोलताना कुचमतात... त्यांना असं वाटतं माझे सिक्रेट याला समजेल .... अनेकजण घरातले प्रॉब्लेम सख्खा मित्र असूनही त्याच्याशी बोलत नाहीत.... जेव्हा बाहेरून समजते की मित्राला अडचणी आहेत मात्र त्याला आपल्याला सांगू वाटले नाही तेव्हा दुसऱ्या मित्राला वाईट वाटणे साहजिक आहे.

अनेक मित्र शाळेतले किरकोळ भांडण घेऊन वयाच्या पन्नाशी पर्यंत दुष्मनी मनात घेऊन समोरून आले तरी बोलत नाहीत. का भांडलो होतो हे देखील अनेकांच्या लक्षात नसते. मात्र मनात एकमेकांविषयी द्वेष असतो तो कायमचा....

अशी मैत्री काय कामाची...

मैत्री सारखं सुख नाही.. जिथं मन मोकळं करू वाटतं अशी एकमेव जागा मित्र असतो.

आयुष्य जेव्हा शेवटच्या घटका मोजत असतं तेव्हा खरी मित्रांची उणीव भासू लागते.... अनेकजण सोडून गेलेले असतात... अनेकजण भेटत नाहीत... परंतु मैत्रीचा ओलावा आटत नाही...!!

मित्रांनी तो काही अडग्या कारणाने आटू पण देऊ नये...!

मित्रांना जपा... त्यांच्याशी मनमोकळे बोला... एकमेकांच्या समोर इगो येऊ देऊ नका... दोन पावलं मागे घेण्याची तयारी ठेवा... तरच आयुष्यभर मित्र सोबत राहील...

सदरचा फोटो एका मित्राच्या भावना किती तीव्रपणे व्यक्त करत आहे....

वयस्क झालेले मित्र पुन्हा कधी भेटतील माहीत नाही... भेटले तर कोणत्या अवस्थेत असतील ते ही माहित नाही... कदाचित त्यांची ही भेट शेवटची देखील असू शकते....!!!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या