🌟परभणीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास उत्सफूर्त प्रतिसाद...!


🌟या शिबीरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले🌟

परभणी (दि.२२ आगस्ट २०२३) : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले.


         या शिबीराचे उद्घाटन तहसीलदार अमित घाटगे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. केदार खटींग, डॉ. कल्याण कदम, दत्ता भाले, रक्तपेढीचे प्रमुख राठोड व मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे अध्यक्ष  स्वप्निल पत्तेवार यांची उपस्थिती होती. यावेळी रक्तदानाचे महत्त्व विशद करतांना डॉ. कल्याण कदम यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत आगामी काळामध्ये असे उपक्रम समाजात राबवले जावेत, अशी इच्छा व्यक्त केली.

         या शिबीरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले समितीच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास एक वृक्ष भेट देण्यात आली. या रक्तदानाची आठवण म्हणून रक्तदात्याने हा वृक्ष जोपासत आपल्या धरतीप्रती पर्यावरण पूरक असा उपक्रम केला याचे कौतुक केले. यावेळी मराठवाड्याचे गुणगौरव करणारे गीत सादर करण्यात आले. आगामी काळात समितीमार्फत विविध उपक्रम घेतले जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

         या समितीला सह आयोजक म्हणून अनेक शहरातील गणमान्य मित्र मंडळ, गणेश मंडळ, देवी मंडळ, ट्रेकर्स ग्रुप यांनी सहकार्य केले. या सर्वांचे समितीच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.   सूत्रसंचालन श्रीमती सुरेखाताई दराडे यांनी केले तर प्रास्ताविक व परिचय सुरेश देशमुख यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या